Adani Green completes JV with TotalEnergies, raises USD 300 million  Sakal
Personal Finance

Adani Group: अदानी समूहाने 'या' कंपनीसोबत केली मोठी डील; उभारणार 300 दशलक्ष डॉलर, काय आहे प्लॅन?

Adani Group:अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने आज TotalEnergies सह 1,050 MW चा संयुक्त उपक्रम (JV) पूर्ण केल्याची घोषणा केली. TotalEnergies ने प्रकल्पांमध्ये 50% भागभांडवल मिळविण्यासाठी AGEL उपकंपनीमध्ये 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.

राहुल शेळके

Adani Group: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (AGEL) आज TotalEnergies सह 1,050 MW चा संयुक्त उपक्रम (JV) पूर्ण झाल्याची घोषणा केली. TotalEnergies ने प्रकल्पांमध्ये 50% भागभांडवल मिळविण्यासाठी AGEL उपकंपनीमध्ये 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.

या व्यवहारासह, TotalEnergies ने AGEL सोबतची आपली पार्टनरशीप मजबूत केली आहे आणि AGEL चे 2030 पर्यंत 45 GW क्षमतेचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये AGEN आणि TotalEnergies यांच्यातील संयुक्त उपक्रमाचा पोर्टफोलिओ 1,050 मेगावॅट आहे. ज्यात आधीच चालू (300 मेगावॅट), अंडर कंस्ट्रक्शन (500 मेगावॅट) आणि अंडर डेवलपमेंट (250 मेगावॅट) यांचा समावेश आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली

या कराराच्या घोषणेनंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 1,627.95 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

या बातमीच्या एक दिवस आधी, अदानी ग्रीन एनर्जी, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब समूहाच्या ग्रीन एनर्जीमध्ये 9,350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. जेणेकरून कंपनी 2030 पर्यंत 45 गिगावॅट क्षमतेचे लक्ष्य गाठू शकेल. या संयुक्त उपक्रमात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि टोटल एनर्जी या दोन्ही कंपन्यांचा समान हिस्सा 50:50 असेल.

2019 मध्ये, TotalEnergiesने अदानी गॅस लिमिटेडमध्ये 37.4% हिस्सा घेण्यासाठी 600 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती, जी आता अदानी टोटल गॅस म्हणून ओळखली जाते.

त्यानंतर, 2021 मध्ये, त्यांनी 2.5 अब्ज डॉलर किंमतीच्या करारामध्ये अदानी ग्रीनमधील 20% हिस्सा आणि अदानी ग्रीनच्या काही ऑपरेशनल सोलर फार्म्समधील 50% हिस्सा खरेदी केला. हा करार भारतातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणुकीपैकी एक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT