Adani Group says government probing accounts of two Mumbai airports  Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानींना आणखी एक झटका, मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरु

Adani Group: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी करत आहे.

राहुल शेळके

Adani Group: अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला कळवले की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील समूहाच्या दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी करत आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या खात्यांची चौकशी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांचे खाते तपासत आहे.

मंत्रालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आर्थिक वर्ष 2017-18 ते आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत माहिती आणि कागदपत्रे मागवली आहेत. अदानी समूहाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. याआधी फेब्रुवारीमध्येही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अदानी समूहाची चौकशी सुरू केली होती.

जानेवारी 2023 मध्येच अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालाद्वारे कंपनीला मोठा धक्का दिला होता. अदानी समुहाने हिंडेनबर्गचे स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचे आरोप फेटाळले होते पण या धक्क्याचा फटका कंपनीच्या शेअर्सना बसला होता.

अदानी समूहाजवळ किती विमानतळ आहेत?

अदानी समूहाचे देशात सात विमानतळ असून त्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. हे विमानतळ 2021 मध्ये अदानी समूहाने विकत घेतले होते. यापूर्वी 2019 मध्ये, सरकारच्या पहिल्या खाजगीकरण मोहिमेदरम्यान, अदानी समूहाला सहा विमानतळ मिळाली होती. याशिवाय नवी मुंबईत नवीन विमानतळ बांधण्याचे काम सुरु आहे.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण

सुप्रीम कोर्टात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीमुळे काल अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत होते. दरम्यान, अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सवर दबाव होता आणि तो 3 टक्क्यांहून अधिक घसरला.

काल शेअर 2422.35 रुपये प्रति शेअर खाली गेला होता, तर मागील ट्रेडिंग सत्रात म्हणजे हा शेअर 2,605.30 रुपये प्रति शेअरवर स्थिरावला होता. याशिवाय अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स 1 ते 1.25 टक्क्यांनी घसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

SCROLL FOR NEXT