Adani Group Sakal
Personal Finance

Adani Group: क्रेडिट कार्ड आणि UPI पेमेंटमध्ये अदानी समूहाची एन्ट्री; गुगल पे, फोन पेला देणार टक्कर

Adani Group: अदानी समूहाच्या नवीन उपक्रमाला अंतिम स्वरूप दिल्यास ग्राहकांना अदानी वन या ग्राहक ॲपद्वारे सेवा उपलब्ध होतील. हे ॲप 2022 च्या शेवटी लॉन्च करण्यात आले होते.

राहुल शेळके

Adani Group: गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढविण्याची योजना आखत आहे. समूह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) साठी केवळ परवान्यासाठी अर्ज करणार नाही तर को-ब्रँडेड अदानी क्रेडिट कार्डसाठी बँकांशी बोलणीही करत आहे. मात्र, अदानी समूहाने या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अदानी समूहाच्या या नव्या पाऊलामुळे गुगल आणि पेटीएम सारख्या स्पर्धकांच्या अडचणी वाढू शकतात.

फायनान्शियल टाईम्स (FT) च्या अहवालात अदानी समूह ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) द्वारे ऑनलाइन शॉपिंग ऑफर करण्यासाठी चर्चा करत आहे. ONDC हे सरकार समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. येथे विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात थेट व्यवहार होतात. या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यासाठी पेमेंट ॲप असणे आवश्यक आहे.

अदानी समूहाच्या नवीन उपक्रमाला अंतिम स्वरूप दिल्यास ग्राहकांना अदानी वन या ग्राहक ॲपद्वारे सेवा उपलब्ध होतील. हे ॲप 2022 च्या शेवटी लॉन्च करण्यात आले होते. या ॲपवर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगसारख्या प्रवासी सेवा उपलब्ध आहेत. अहवालानुसार, समूहाचे ई-कॉमर्स आणि पेमेंट प्लॅटफॉर्म प्रथम त्यांच्या विद्यमान ग्राहकांना लक्ष्य करतील.

अदानी ग्रुप समोर अनेक स्पर्धक असतील. उदाहरणार्थ, Google, PhonePe आधीच UPI-आधारित पेमेंट ॲप्स चालवतात तर पेटीएम आणि टाटा सारखे देशांतर्गत समूह ONDC द्वारे किराणा आणि फॅशन शॉपिंग ऑफर करतात.

तज्ञ काय म्हणतात?

"हा देश केवळ टाटा, अंबानी आणि अदानी या तीन उद्योग समूहांद्वारे चालवला जातो. अदानी हा तीन गटांपैकी एक आहे ज्यामध्ये आवश्यक ग्राहक उत्पादनांचा व्यवसाय नाही," बेंगळुरूस्थित तंत्रज्ञान तज्ञ जयंत कोल्ला यांनी सांगितले. अशा परिस्थितीत हा नवा उपक्रम अदानी समूहासाठी नवीन दरवाजे उघडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT