Adani Ports will invest rs 20,000 crore in Kerala’s Vizhinjam Transhipment Terminal by 2030  Sakal
Personal Finance

Adani Port: अदानींच्या ताब्यात आणखी एक बंदर, केरळमध्ये करणार 20 हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे प्लॅन?

Adani Vizhinjam Port: या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 7,700 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

राहुल शेळके

Adani Vizhinjam Port: अदानी समूह विझिंजम बंदरावर जोमाने काम करत आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची योजना आहे. यासाठी अदानी केरळमधील विझिंजम येथे बांधल्या जाणाऱ्या बंदरावर 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ही गुंतवणूक 2030 पर्यंत केरळमधील विझिंजम ट्रान्सशिपमेंट टर्मिनलमध्ये केली जाईल. अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी ही माहिती दिली.

अदानी समूहाने या वर्षाच्या सुरुवातीला इस्रायलमधील हैफा बंदर 1.2 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले आणि आता ते पूर्व आफ्रिका (केनिया आणि टांझानिया), व्हिएतनाम आणि भूमध्य प्रदेशातील बंदरे विकत घेण्याचा विचार करत आहेत.

अदानी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ राजेश झा यांनी सांगितले की या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 7,700 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. त्यात अदानी समूहाच्या 2,500 ते 3,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. उर्वरित गुंतवणूक केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे.

केरळमधील विझिंजम येथे उभारले जाणारे हे बंदर अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. हे बंदर पूर्ण झाल्यावर श्रीलंकेच्या कोलंबो बंदरासारख्या परदेशी ट्रान्सशिपमेंट हबवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात चिनी कंपन्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. विझिंजम बंदर हे मोठी जहाजे किनाऱ्यावर आणण्यासाठी आवश्यक आहे.

कंपनी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत 650 दशलक्ष डॉलर किंमतीचे सर्व विदेशी चलन रोखे पुन्हा खरेदी करेल. विझिंजम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंदाजे किंमत सुमारे 7,700 कोटी रुपये आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी या बंदरात रस दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT