Adar Poonawalla Sakal
Personal Finance

Adar Poonawalla House: इंग्रजांच्या लंडनमध्ये पुणेकराने घेतलं सर्वात महागडे घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

Adar Poonawalla: घराचे रूपांतर कंपनी गेस्ट हाऊसमध्ये केले जाणार आहे

राहुल शेळके

Adar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनमधील सर्वात महागडे घर सुमारे 1446 कोटींमध्ये खरेदी करण्याचा करार केला आहे. पूनावाला यांनी खरेदी केलेले घर 25,000 स्क्वेअर फुटांचे आहे.

फायनान्शियल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची यूके उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेस ही मालमत्ता ताब्यात घेईल. हे घर लाल-विटांनी बांधलेले आहे आणि हेन्री डंकन मॅकलॅरेन, बॅरन अॅबरकॉनवे यांच्या नावावर आहे.

या घराचे रूपांतर कंपनी गेस्ट हाऊसमध्ये केले जाणार असून तेथे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. 138 दशलक्ष युरोचा हा महागडा करार आहे. अॅबरकॉनवे हाऊससोबतचा हा करार लंडनमधील आतापर्यंतचा दुसरा सर्वात महागडा करार आहे. जानेवारी 2020 मध्ये 2-8A रटलँड गेटचा सर्वात महागडा करार होता, जो 210 दशलक्ष युरोमध्ये झाला होता.

फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हिल स्ट्रीट, लंडन येथे 25000 स्क्वेअर फुटांचे हे घर 1920 मध्ये बांधण्यात आले होते. हे घर SII च्या UK-आधारित उपकंपनी Serum Life Sciences ने विकत घेतले आहे. मालमत्तेसोबतच त्यांचे गेस्ट हाऊस आणि मेफेअरची बागही ताब्यात घेण्यात आली आहे. या 6 बेडरूमच्या घरातमध्ये एक मोठा स्विमिंग पूल आणि पाहुण्यांसाठी आसनव्यवस्था आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड कमी किंमतीच्या लसीकरणाचे उत्पादन करून जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी बनली आहे. पुढील तीन वर्षांत, पुणेस्थित सीरम कंपनी युरोपियन आणि अमेरिकन प्रवाशांसाठी पिवळा ताप आणि डेंग्यूच्या लसीचे उत्पादन सुरू करण्याची योजना आखत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT