aditya birla paints sakal
Personal Finance

Aditya Birla Paints : आदित्य बिर्ला समूह रंग उद्योगात

आदित्य बिर्ला समूहाने रंगउद्योगात प्रवेश केला असून, बिर्ला ओपस हा सजावटीच्या रंगांचा ब्रँड दाखल केल्याची घोषणा केली आहे. या समूहातील प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लि.ने १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आदित्य बिर्ला समूहाने रंगउद्योगात प्रवेश केला असून, बिर्ला ओपस हा सजावटीच्या रंगांचा ब्रँड दाखल केल्याची घोषणा केली आहे. या समूहातील प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लि.ने १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. पुढील तीन वर्षात १० हजार कोटी रुपयांचा महसूल कमावण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे, असे यावेळी बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले.

देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या आदित्य बिर्ला समूहाने वेगाने विस्तार करत असलेल्या आणि तब्बल ८०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या देशांतर्गत सजावटीच्या रंगांच्या बाजारपेठेत पदार्पण केले आहे. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, ‘‘आमचा नवा रंग उद्योग ‘बिर्ला ओपस’ नव्या भारताचे प्रतिबिंब आहे.

बांधकाम क्षेत्रातील साहित्यपुरवठा क्षेत्राबाबत आदित्य बिर्ला समूहाला असलेली सखोल समज, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव या आधारावर बिर्ला ओपस रंग उद्योगक्षेत्राच्या सध्याच्या क्षमतेमध्ये ४० टक्के वृद्धीसह या उद्योगामध्ये नवे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. ‘बिर्ला ओपस’कडे एक मोठे स्टार्ट-अप म्हणून पाहिले गेले पाहिजे. स्टार्ट-अपची ऊर्जा, ताकद, विश्वसनीयता आणि ब्रँड मजबुती यांचा अनोखा मिलाफ यात आहे.’’

बिर्ला ओपस’ची उत्पादने मार्च २०२४च्या मध्यापासून पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये आणि जुलै २०२४ पर्यंत देशातील शहरांमधील एक लाख लोकांपर्यंत पोहोचतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT