Aditya Birla Housing Finance Ltd Sakal
Personal Finance

Aditya Birla Housing Finance Ltd : ‘आदित्य बिर्ला हाउसिंग’चे दुप्पट कर्जवितरणाचे उद्दिष्ट

कंपनीच्या देशभरात १३५ शाखा असून, तिने देशभरातील विकसक आणि बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Aditya Birla Housing Finance Ltd : आदित्य बिर्ला कॅपिटलची उपकंपनी आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लि.ने पुढील तीन वर्षांत कर्जवितरण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, देशभरात सेवाविस्तार करण्यावर भर दिला आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) मार्च २०२४ पर्यंत १८,४२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, यात वार्षिक ३३ टक्के वाढ झाली आहे. या वाढीने उद्योग क्षेत्राच्या वेगालाही मागे टाकले आहे, अशी माहिती कंपनीचे एमडी आणि सीईओ पंकज गाडगीळ यांनी दिली. कंपनीच्या देशभरात १३५ शाखा असून, तिने देशभरातील विकसक आणि बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी केली आहे.

कंपनीने परवडणाऱ्या घरांसाठी कर्जपुरवठा करण्याला प्राधान्य दिले असून, ४१ टक्के हिस्सा परवडणाऱ्या घरांच्या कर्जाचा आहे. कंपनी विकासकांना २० ते २३ कोटींपर्यंतचे कर्ज पुरवते. कंपनीचे ६५ हजारांहून अधिक ग्राहक असून, त्यात मार्च २०२४ पर्यंत वार्षिक १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीने ‘ट्रॅक माय लोन’सारख्या आधुनिक सुविधेद्वारे जलद कर्जसेवा उपलब्ध केली आहे. वैयक्तिकृत सेवा, जलद कर्ज प्रक्रिया, सूक्ष्म-कर्जांसह १५ योजनांसह कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे, असेही गाडगीळ यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT