GPT Infraprojects Sakal
Personal Finance

GPT Infraprojects : रेल्वेकडून ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअरमध्ये झपाट्याने वाढ, एका वर्षात 290% परतावा...

जीपीटी ग्रुपची बांधकाम कंपनी जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्सला (GPT Infraprojects) रेल्वेकडून एक मेगा ऑर्डर मिळाली आहे, ज्यानंतर स्टॉकमध्ये 15 टक्क्यांपर्यंत मजबूत वाढ दिसून आली.

सकाळ वृत्तसेवा

जीपीटी ग्रुपची बांधकाम कंपनी जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्सला (GPT Infraprojects) रेल्वेकडून एक मेगा ऑर्डर मिळाली आहे, ज्यानंतर स्टॉकमध्ये 15 टक्क्यांपर्यंत मजबूत वाढ दिसून आली. हा शेअर नुकताच इंट्राडेमध्ये 199 रुपयांवर पोहोचला. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने 1 वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 290% बंपर परतावा दिला आहे.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्सला मध्य रेल्वेकडून 487 कोटीची मोठी ऑर्डर मिळाली आहे. बीएसई वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे. कंपनीला ही ऑर्डर सोलापूर डिव्हिजनच्या सोलापूर-उस्मानाबाद सेक्शनमधील एका बांधकामाबाबत आहे.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट ही कोलकाता स्थित इन्फ्रा कंपनी आहे जी प्रामुख्याने रेल्वेवर फोकस्ड आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटच्या विकासात कंक्रीट स्लीपर बनवणारी ही देशातील एकमेव कंपनी आहे. त्याचा व्यवसाय भारताबाहेरही पसरलेला आहे.

कंपनीच्या ऑर्डर बुकची किंमत आता 3309 कोटी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यांना आतापर्यंत आर्थिक वर्ष 2025 मध्ये 127 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. मध्य रेल्वेला मिळालेली ऑर्डर एका संयुक्त उपक्रमाला देण्यात आली होती ज्यामध्ये जीपीटी इन्फ्राचा 26% हिस्सा आहे.

म्हणजे एकूण ऑर्डरपैकी 127 कोटी रुपयांच्या ऑर्डर कंपनीच्या खात्यात आहेत. चालू आर्थिक वर्षातील ही पहिली ऑर्डर आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1100 कोटी आहे. त्या तुलनेत ऑर्डर तिप्पट आहे.

जीपीटी इन्फ्रा शेअर्सने बुधवारी इंट्राडेमध्ये 15 टक्क्यांची तेजी नोंदवली. सध्या हा शेअर 190 रुपयांवर ट्रेड करत आहे. 4 मार्चला या शेअरने 210 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक (All Time High) गाठला होता. या आठवड्यात स्टॉकने आतापर्यंत सुमारे 8 टक्के, दोन आठवड्यात 9 टक्के, एका महिन्यात सुमारे 20 टक्के, या वर्षी आतापर्यंत 11 टक्के, सहा महिन्यांत 65 टक्के, एका वर्षात 290 टक्के आणि 340 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT