All malpractices of Harshad Mehta, Ketan Parekh era back via Kolkata says Harsh Goenka  Sakal
Personal Finance

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

Stock Prices Manipulation: प्रसिद्ध उद्योगपती आणि RPG समुहाचे अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. हर्ष गोयंका यांनी आता शेअर बाजारातील शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

राहुल शेळके

Stock Prices Manipulation: प्रसिद्ध उद्योगपती आणि RPG समुहाचे अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी  आणि सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. हर्ष गोयंका यांनी आता शेअर बाजारातील शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचे युग परत आले आहे असे ते म्हणाले.

कोलकातामध्ये शेअरच्या किमतीत फेरफार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कंपन्यांचे प्रवर्तक आणि स्टॉक ब्रोकर्स यांचा समावेश आहे. हर्ष गोयंका यांनीही याप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे.

प्रवर्तक आणि दलाल मिळून हा खेळ खेळत आहेत

हर्ष गोएंका यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, सध्या शेअर बाजारात प्रचंड वाढ होत आहे. याचा फायदा घेण्यासाठी हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या धर्तीवर काही लोक काम करत आहेत. हे नेक्सस प्रामुख्याने कोलकाता येथून कार्यरत आहे. कंपन्यांचे प्रवर्तक प्रॉफिट एंट्रीच्या माध्यमातून आपल्या नफ्यात वाढ होत असल्याचे दाखवत आहेत. या हेराफेरीत गुजराती आणि मारवाडी दलालही सामील आहेत.

लहान गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते

त्यांनी लिहिले की, आता अर्थ मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून चौकशी करून कारवाई करण्याची वेळ आली आहे. शेअर बाजारातील अशा चुकीच्या पद्धतींमुळे शेवटी छोट्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. या पोस्टमध्ये त्यांनी अर्थ मंत्रालयालाही टॅग केले आहे.

आरपीजी ग्रुपमध्ये 15 कंपन्यांचा समावेश आहे

हर्षवर्धन गोएंका हे 1988 पासून RPG ग्रुपचे अध्यक्ष आहेत. या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 कंपन्यांचा समावेश आहे. RPG समूहाची उलाढाल अंदाजे 4.7 अब्ज डॉलर आहे. त्यांच्या या मोठ्या खुलाशानंतर शेअर बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT