Foreign Currency sakal
Personal Finance

Foreign Currency : परकी चलनसाठ्याचा सार्वकालिक विक्रम

देशाच्या परकी चलनसाठ्याने ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ६५० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडत नवा विक्रम नोंदवला आहे. परकी चलनसाठ्यात ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४.८४ अब्ज डॉलरची भर पडली आणि तो ६५१.५ अब्ज डॉलरच्या आतापर्यंतच्या सार्वकालिक विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशाच्या परकी चलनसाठ्याने ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ६५० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडत नवा विक्रम नोंदवला आहे. परकी चलनसाठ्यात ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४.८४ अब्ज डॉलरची भर पडली आणि तो ६५१.५ अब्ज डॉलरच्या आतापर्यंतच्या सार्वकालिक विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात देशाचा परकी चलनसाठा २.०३ अब्ज डॉलरने घसरून ६४६.७ अब्ज डॉलर झाला होता. रिझर्व्ह बँकेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकी चलनसाठ्याचा सर्वांत मोठा घटक असलेल्या परकी चलन मालमत्तेत ५.१ अब्ज डॉलरने प्रचंड वाढ होऊन ती ५७२.६ अब्ज डॉलरवर पोहोचली. मात्र, या कालावधीत सोन्याचा साठा २१.२ कोटी डॉलरने कमी होऊन ५६.५ अब्ज डॉलर झाला.

स्पेशल ड्रॉइंग राइट्स १.७ कोटी डॉलरने कमी होऊन १८.१२ अब्ज डॉलरवर आले. याच कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील (आयएमएफ) राखीव निधी १० लाख डॉलरने वाढून ४.३३ अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी १७ मे रोजी परकी चलनसाठ्याने ६४८.७ अब्ज डॉलर ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी नोंदवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT