Amazon cuts jobs in music streaming unit  Esakal
Personal Finance

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Amazon Layoffs: बुधवारी कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली

राहुल शेळके

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनने म्युझिक विभागातील कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आणि लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कर्मचार्‍यांवर त्याचा परिणाम झाला, असे मीडिया अहवालात म्हटले आहे. अॅमेझॉनने गेल्या महिनाभरात स्टुडिओ, व्हिडिओ आणि म्युझिक विभागांमधील नोकऱ्या कमी केल्या आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत Amazon ने एकूण 15.4 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यातील सर्वात मोठी संख्या अशा कर्मचाऱ्यांची आहे जे वेअरहाऊस आणि शिपिंग उत्पादनांमध्ये काम करतात.

याशिवाय कंपनीत सुमारे 35,000 कॉर्पोरेट कर्मचारी आहेत. कंपनीने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी सांगितले होते की, कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीसाठी कठीण आहे.

परंतु भविष्यात चांगल्या गुणवत्तेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. ते म्हणाले होते की ते वेगवेगळ्या विभागांच्या कामावर नियंत्रण ठेवत आहेत आणि ज्या व्यवसायातून आम्हाला फारसा नफा मिळत नाही ते व्यवसाय बंद करणार आहोत.

बायजूमधून 600 कर्मचारी काढून टाकले

अडचणीत सापडलेली एडटेक कंपनी बायजूने देखील ऑक्टोबरमध्ये कंटेंट आणि मार्केटिंग टीममधून सुमारे 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा मार्केटिंग टीमपेक्षा कंटेंट आणि व्हिडिओ टीमवर जास्त परिणाम झाला. कंटेंटचा भाग असलेल्या शिक्षकांना देखील या निर्णयाचा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT