2000 Rupees Note Sakal
Personal Finance

2000 Rupee Note: आजपासून 'या' ठिकाणी 2,000 रुपयांची नोट चालणार नाही, काय आहे कारण?

2000 Rupee Note: रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे.

राहुल शेळके

2000 Rupee Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे महिन्यात 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. यासाठी सेंट्रल बँकेने लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, ज्यामध्ये या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घेऊ शकतात.

मात्र, अजूनही सुमारे 24 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या Amazon ने आजपासून म्हणजेच मंगळवारपासून भारतात 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे.

माहितीनुसार, Amazon यापुढे कॅश-ऑन-डिलिव्हरी (सीओडी) पेमेंट दरम्यान 2,000 रुपयांची नोट स्वीकारणार नाही. 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती.

आरबीआयने देशातील सर्व लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास किंवा बदलून घेण्यास सांगितले होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत खुलासा केला होता की, 30 जूनपर्यंत भारतीय बँकांकडे 2,000 रुपयांच्या 2.72 लाख कोटी नोटा जमा झाल्या आहेत.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या या नोटांपैकी 76 टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत किंवा बदलल्या गेल्या आहेत.

अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे

लोकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना चार महिन्यांचा अवधी मिळाला आहे जेणेकरून ते सहजपणे बँकांमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलून घेऊ शकतील.

2000 रुपयांची नोट कशी बदलायची?

1. जर तुमच्याकडे 2,000 रुपयांची नोट असेल तर ती घेऊन तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जा.

2. यानंतर तुम्ही नोट बदलण्यासाठी स्लिप भरा आणि सबमिट करा.

3. लक्षात ठेवा RBI ने बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी त्यांचे स्वतःचे नियम ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

4. लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँकेने लोकांना 20,000 रुपयांपर्यंत म्हणजेच 10 नोटा एकावेळी बदलण्याची सुविधा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT