Amazon to stop accepting rs 2000 notes for Cash on Delivery services know Details  Sakal
Personal Finance

Amazon: 2,000 च्या नोटेबाबत अ‍ॅमेझॉनचा मोठा निर्णय, 19 सप्टेंबरपासून लागू होणार नवीन नियम

Amazon ने 2,000 रुपयांच्या नोटेबाबात नवीन नियम जारी केला आहे.

राहुल शेळके

Amazon: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेत 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ती आता जवळ आली आहे. बँकांव्यतिरिक्त, लोकांना RBI च्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा देखील दिली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही लोकांना त्यांच्या नोटा निर्धारित तारखेपर्यंत बँकांमध्ये जमा करा किंवा त्या बदलून घ्याव्यात, असे आवाहन केले होते.

सरकारने चलनात असलेल्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. यानंतर, बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर, 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

तुमच्याकडेही 2,000 रुपयांच्या नोटा असतील, तर तुमच्याकडे त्या बदलण्याची संधी आहे, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कारण आता जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 2,000 रुपयांच्या नोटेबाबात नवीन नियम जारी केला आहे.

Amazon कंपनीने कॅश ऑन डिलिव्हरी सेवेवर 2,000 रुपयांची नोट स्वीकारण्याबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे.

Amazon कंपनीने म्हटले आहे की 19 सप्टेंबरपासून 2,000 रुपयांच्या नोटा कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) पेमेंट म्हणून स्वीकारल्या जाणार नाहीत. अॅमेझॉनने म्हटले आहे की, ते सध्या 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. पण 19 सप्टेंबर 2023 पासून 2,000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

एकाच वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन 2,000 रुपयांची नोट बदलू शकता. सध्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा 20 हजार रुपयांपर्यंत आहे.

नोटा जमा करण्यासाठी काय नियम आहेत?

लोक त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांची नोट जमा करू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. तुम्ही कोणत्याही बँकेचे ग्राहक नसले तरी तुम्ही त्या बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT