Amazon's Twitch to cut about 35 percent of staff in latest series of layoffs  Sakal
Personal Finance

Twitch Layoff: जेफ बेझोस यांच्या कंपनीतील 500 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! काय आहे कारण?

Amazon's Twitch Layoff: लाइव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ट्विच कमीत कमी 500 कर्मचारी किंवा 35 टक्के कर्मचारी काढून टाकू शकतात. ट्विचला अॅमेझॉनने 2014 मध्ये विकत घेतले होते. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की ट्विच शक्यतो बुधवारी 10 जानेवारी रोजी म्हणजे आजच्या दिवशी कर्मचारी कपातीची घोषणा करू शकते.

राहुल शेळके

Amazon's Twitch Layoff: लाइव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी ट्विच कमीत कमी 500 कर्मचारी किंवा 35 टक्के कर्मचारी काढून टाकू शकतात. ट्विचला अॅमेझॉनने 2014 मध्ये विकत घेतले होते. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की ट्विच शक्यतो बुधवारी 10 जानेवारी रोजी म्हणजे आजच्या दिवशी कर्मचारी कपातीची घोषणा करू शकते.

मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी कंपनीतील अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.

गेल्या वर्षी, ट्विचचे माजी सीईओ एम्मेट शीअर यांनी अधिग्रहणानंतर सुमारे 10 वर्षांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी, मुख्य ग्राहक अधिकारी आणि मुख्य महसूल अधिकारी यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता. संभाव्य कर्मचारी कपाती मागील कारण म्हणजे ट्विचचे सतत होणारे नुकसान असे म्हटले जात आहे.

कंपनीने डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, ती दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेतून बाहेर पडणार आहे. यासाठी ट्विचचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन क्लॅन्सी यांनी खर्चाचा हवाला दिला होता.

ट्विच कंपनीत यापूर्वीही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कंपनीत दोन फेऱ्यांमध्ये कर्मचारी कपात झाली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी अॅमेझॉनने विकत घेतल्यानंतर नऊ वर्षानंतरही व्यवसायात नफा मिळवत नाही. तसेच अॅमेझॉनने 2022 मध्ये सर्वात मोठी कर्मचारी कपात केली होती, ज्यामध्ये सुमारे 27 हजार कर्मचारी प्रभावित झाले होते.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ट्विचच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, दर महिन्याला 1.8 अब्ज तास व्हिडिओ वेबसाइट चालवणे खूप महाग आहे. ट्विच त्याच्या पायाभूत सुविधांसाठी Amazon वर अवलंबून असूनही अशी परिस्थिती आहे. गेल्या डिसेंबरमध्ये, ट्विचचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन क्लेन्सी यांनी सांगितले की कंपनी दक्षिण कोरियामधील कामकाज बंद करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT