Ambuja Cements to invest rs 6,000 crore in Green Power; targets capacity of 1,000 mw  Sakal
Personal Finance

गुजरातमध्ये अदानी करणार विराट प्रकल्प! 6,000 कोटी रुपयांची होणार गुंतवणूक, नेमका प्लॅन काय?

Adani Group: कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये निधी संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही.

राहुल शेळके

Adani Group: सिमेंट क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेली अंबुजा सिमेंट कंपनी अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली.

गुजरात आणि राजस्थानमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे 1,000 मेगावॅट (MW) क्षमता गाठण्याची कंपनीचे लक्ष आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये निधी संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही.

या प्रकल्पांमुळे कंपनीची एकूण हरित ऊर्जा क्षमता सध्याच्या 19 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढेल. या महिन्याच्या सुरुवातीला, अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजमधील बहुतांश भागभांडवल 5,185 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

या ऊर्जा प्रकल्पामुळे उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच विजेचा खर्चही कमी होईल, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे, विजेची किंमत 6.46 रुपये प्रति kWh वरून 5.16 रुपये प्रति kWh पर्यंत कमी होईल, म्हणजेच 1.30 रुपये प्रति kWh (20%) कमी होईल.

अदानी समुहाने पुढील काही वर्षात ग्रीन एनर्जीमध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले होते की अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटचे 2025 किंवा त्यापूर्वी शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

शेअर्समध्ये जोरदार वाढ

अंबुजा सिमेंट आपली वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (WRS) क्षमता सध्याच्या 103 MW वरून 397 MW वर वाढवत आहे, ज्यामुळे वीज खर्च आणखी कमी होईल. सोमवारी अंबुजा सिमेंटचे शेअर्स 1.67% वाढीसह 531.15 रुपये प्रति शेअर वर व्यवहार करत होता. एका महिन्यात हा शेअर 26 टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT