Amkay Products Limited IPO to start on April 30 strong response in gray market Sakal
Personal Finance

Amkay Products IPO : एमके प्रोडक्ट्स लिमिटेडचा आयपीओ 30 एप्रिलला सुरु होणार, ग्रे मार्केटमध्ये दमदार रिस्पॉन्स...

एमके प्रोडक्ट्स लिमिटेडचा आयपीओ 30 एप्रिल अर्थात उद्यापासून खुला होत आहे. यात तुम्ही 3 मेपर्यंत गुंतवणूक करु शकता.

सकाळ वृत्तसेवा

Amkay Products IPO : एमके प्रोडक्ट्स लिमिटेडचा आयपीओ 30 एप्रिल अर्थात उद्यापासून खुला होत आहे. यात तुम्ही 3 मेपर्यंत गुंतवणूक करु शकता. आयपीओबाबत अलॉटमेंट 5 मे रोजी आणि आयपीओ न लागल्यास रिफंड्स 7 मेपर्यंत केले जातील. तर तुमच्या डीमॅट खात्यात 7 मेपर्यंत शेअर्स क्रेडिट केले जातील.

तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एमके प्रोडक्ट्स लिमिटेडचे शेअर्स 8 मेपर्यंत लिस्ट केली जातील. अशात ग्रे मार्केटमध्ये या कंपनीबद्दल अनेक पॉझिटीव्ह रिऍक्शन्स येत आहेत. 55 रुपयांच्या शेअरवर 25 रुपयांचा प्रीमियम घोषित करण्यात आला आहे. म्हणजेच जो कोणी या आयपीओचे सबस्क्रीप्शन घेईल त्याला फक्त 6 महिन्यांत 45% परतावा मिळण्याची शक्यता आहे.

एमके प्रोडक्ट्स लिमिटेडची स्थापना ऑक्टोबर 2007 मध्ये झाली. ही कंपनी हेल्थ केअर प्रोडक्ट्स, मेडिकल डिवायसेज आणि डिस्पोजेबल मेडिकल प्रोडक्ट्स तयार करते. ही कंपनी एकूण 30 प्रोडक्ट्सचा व्यवसाय करते,

त्यापैकी 20 प्रोडक्ट्स ती स्वतः तयार करते आणि 10 प्रोडक्ट्स इतर कंपन्यांकडून विकत घेते आणि बाजारात विकते. कश्यप प्रवीण मोदी आणि हिमांशू कांतीलाल बटाविया हे या कंपनीचे प्रमोटर आहेत. कंपनीचे ऑफिस ठाणे महाराष्ट्रात आहे. तर कंपनीचे दोन प्रोडक्शन युनिट आहेत.

गेल्या 1 वर्षात कंपनीच्या महसुलात 23.22 टक्के घट झाली आहे, परंतु करानंतरचा नफा (PAT) 2.94% ने वाढला आहे. कंपनीचे बँक कर्ज आणि बाजारातील कर्जे अंदाजे 5 कोटीवर पोहोचली आहेत. या बदल्यात कंपनीकडे सुमारे 19 कोटीची मालमत्ता आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत, कंपनीचा करानंतरचा नफा 2 कोटींहून अधिक झाला होता, तर गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा करानंतरचा एकूण नफा सुमारे 1.5 कोटी होता.

कंपनीला 10 रुपयांच्या मूळ किमतीचा शेअर 55 रुपयांना विकायचा आहे. जर लोक शेअर मार्केटमध्ये हा शेअर 55 रुपयांमध्ये खरेदी करण्यास तयार नसतील तर कंपनी हा शेअर 52 रुपयांनाही विकण्यास तयार आहे.

पण एकाच वेळी 2000 शेअर्स खरेदी करावे लागतील अशी अट आहे. म्हणजे तुम्हाला 1 लाख 10 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. ग्रे मार्केट तज्ज्ञांच्या मते, स्टॉक मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सची अंदाजे लिस्टिंग किंमत 80 असेल. म्हणजेच 3 मे रोजी गुंतवलेल्या पैशावर 8 मे रोजी 45% परतावा मिळण्याची शक्यता आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT