Anmol Ambani Sebi Reliance Home Finance Sakal
Personal Finance

Anmol Ambani: अनिल अंबानींचा मुलगा अनमोलवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

Anmol Ambani Update: शेअर बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे मुख्य अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना सेबीने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

राहुल शेळके

Anmol Ambani Update: शेअर बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे मुख्य अधिकारी गोपालकृष्णन यांना सेबीने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दोघांनाही 45 दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

SEBIने (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) सोमवारी 23 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की त्यांनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत तपास पूर्ण केला आहे. नियामकाने सांगितले की, तपासात असे आढळून आले आहे की ज्या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कॉर्पोरेट कर्ज किंवा जीपीसीएल कर्ज मंजूर केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्टपणे निर्देश दिले होते की अशा कर्जाची मंजुरी दिली जाणार नाही, तरीही कर्ज देण्यात आले.

अनमोल अंबानी यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी Acura प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले, तर संचालक मंडळाने 11 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला आणखी कर्ज न देण्याचे निर्देश दिले होते.

सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर 24 लोकांना सिक्युरिटीज मार्केटमधून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

सेबीने म्हटले आहे की अनिल अंबानी कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी मार्केटशी संबंधित राहणार नाहीत किंवा ते कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पदावर काम करणार नाहीत.

2018-19 मध्ये रिलायन्स होम फायनान्सच्या निधी वळवण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, SEBI ने तपास केला आणि असे दिसून आले की अनिल अंबानी हे या फसवणूक योजनेचे मास्टरमाईंड होते. ज्यामुळे भागधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT