Investment Criteria Sakal
Personal Finance

Investment Criteria : गुंतवणुकीचा ‘चष्मा’

Share Market : गुंतवणूक परताव्यासाठी केली जात असल्याने शेअरवरील परतावा मुदत ठेवींवरील व्याजापेक्षा जास्त असावा

गोपाळ गलगली

प्रत्येक शेअर बाजार हा मानवनिर्मित शेअररुपी वृक्षांचे जंगल आहे. या जंगलात हजारो वृक्षवेली वाढत असतात किंवा कोमेजत असतात. जगाच्या पाठीवर न्यूयॉर्क, हाँगकाँग, शांघाय, लंडन येथील शेअर बाजार असे २० शेअर बाजाररुपी जंगले आहेत.

या जंगलांची काळजी घेण्यासाठी ‘डाऊ जोन्स’, ‘निक्केई’, ‘एस अँड पी’ असे माळी नेमण्यात आले आहेत. भारतात मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) अशी दोन जंगले आहेत आणि ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ हे त्यांचे माळी आहेत.

हे माळी शेअररूपी झाडांची काळजी घेत असतात. झाडांची आवड असणारे या जंगलांना दररोज भेट देऊन शेअररुपी झाडांची खरेदी-विक्री करत असतात. पैसा हे या झाडांचे खत आहे. अशा या शेअररूपी जंगलातून सागाची झाडे शोधून काढणे फारच अवघड आहे.

त्यासाठी योग्य निकष वापरावे लागतात; अन्यथा चुकीचे झाड निवडले, तर त्याची वाढ होत नाही किंवा वाढलेलेच झाड घेतले, तर फारसा उपयोग होत नाही. उत्तम झाडे म्हणजेच शेअर निवडण्यासाठी काही विशिष्ट चष्म्यांची गरज असते. वेळोवेळी हे चष्मे घालून उत्तम शेअररुपी झाडांची निवड करता येऊ शकते.

  • परतावा : गुंतवणूक परताव्यासाठी केली जात असल्याने शेअरवरील परतावा मुदत ठेवींवरील व्याजापेक्षा जास्त असावा. त्यासाठी एक ते तीन वर्षे बऱ्यापैकी परतावा दिलेलेे शेअर निवडावेत.

  • म्युच्युअल फंड : ज्यात म्युच्युअल फंडाची भरपूर गुंतवणूक आहे, असे शेअर निवडा. असे शेअर फंडांनी तावून सुलाखूून घेतलेले असतात.

  • ‘सीएजीआर’ वाढ : कमीतकमी तीन वर्षांचा चक्रवाढीने विक्री आणि नक्त-नफा दाखविणारा शेअर असावा.

  • भागभांडवल आणि गंगाजळी: निवडलेला शेअर कमीतकमी भागभांडवल व जास्तीत जास्त गंगाजळी असणारा असावा. यातून बोनस शेअर मिळण्याची शक्यता असते.

  • मालकी भागभांडवल : कंपनीमधे मालकाचे भागभांडवल किती टक्के आहे, यावरून कंपनी कशी चालविली जाईल, याचा अंदाज येतो.

  • व्यवसायाचे स्वरूप : निवडलेली कंपनी कोणत्या व्यवसायात आहे, हे पाहावे लागेल.

  • संचालक मंडळ : कोणते नावाजलेले उद्योजक कंपनीच्या मागे उभे आहेत, हे पाहाणेही महत्त्वाचे आहे.

अशा या अनेक ‘चष्म्यां’तून शेअरची पाहणी करून गुंतवणूक करावी लागेल आणि घेतलेल्या शेअरची उजळणीही अधूनमधून या ‘चष्म्यां’तून करावी लागेल. मात्र, ‘बुद्धी’ हाच आपला खरा ‘चष्मा’ हे लक्षात ठेवा. वाढत्या बाजारात अनेक उत्तमोत्तम शेअर खुणावत असताना नव्या व जुन्या गुंतवणूकदारांनी या ‘चष्म्यां’चा उपयोग करावा.

(डिस्क्लेमरः शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे हिताचे असते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT