Arundhati Bhattacharya Sakal
Personal Finance

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Arundhati Bhattacharya: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकांना मोठा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, बँकांमध्ये पैसे ठेवण्याचे युग आता संपले आहे. विशेषत: तरुणवर्ग आता गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक जोखीम पत्करण्यास तयार झाला आहे.

राहुल शेळके

Arundhati Bhattacharya Bank Deposit: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकांना मोठा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, बँकांमध्ये पैसे ठेवण्याचे युग आता संपले आहे. विशेषत: तरुणवर्ग आता गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक जोखीम पत्करण्यास तयार झाला आहे. अशा स्थितीत बँकांनी वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. त्या म्हणाल्या की, बँकिंग उद्योग मोठ्या बदलांमधून जात आहे.

ठेवीतील गुंतवणुकीचे युग परत येणार नाही

अरुंधती म्हणाल्या, ठेवींवर अवलंबून राहण्याऐवजी आता ठेवी आणि कर्ज यांच्यात अधिक संतुलित संबंध निर्माण झाला आहे. ही स्थिती प्रत्येक अर्थव्यवस्थेत दिसून येते. त्या म्हणाल्या, आधी आमची बँकिंग व्यवस्था ठेवींवर अवलंबून होती. मला वाटत नाही की हा टप्पा परत येईल.

आजची तरुणाई गुंतवणुकीत धोका पत्करण्यास तयार आहे

अरुंधती म्हणाल्या, त्यांच्या पिढीला कुटुंबातील वडीलधाऱ्या आणि तरुण या दोघांच्या गरजा भागवाव्या लागतात. पण, आज तरुण पिढी बचतीऐवजी केवळ गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा (SIP) मोठा वाटा आहे. यामुळे लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला गुंतवणुकीची सोय आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती बाजारात अल्प प्रमाणात गुंतवणूक करू शकते.

आज बाजारात छोट्या रकमेसह गुंतवणूक करणे शक्य

भट्टाचार्य म्हणाल्या की, आज तुम्ही बाजारात 2000 रुपये गुंतवू शकता. तुम्ही हे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवता आणि तो तुमचे पैसे शेअर्समध्ये गुंतवतो. अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये प्रवेश मिळतो. या बदलामुळे बँकांचे काम वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकांच्या ट्रेझरी विभागांना त्यांच्या ट्रेझरी कामकाजात वाढ करावी लागेल. यापूर्वी या विभागावर हलगर्जीपणाचा आरोप होत होता. आता त्याला मालमत्ता आणि देणी यांच्यात समतोल राखण्यासाठी सक्रिय राहावे लागेल.

बँकांच्या ठेवी आणि पत वाढ यातील तफावत वाढत आहे

अलीकडेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही बँकांमधील ठेव आणि पत वाढ यांच्यातील वाढत्या तफावतीवर चिंता व्यक्त केली होती. गव्हर्नर म्हणाले होते की, लोक आता बचतीसाठी बँक ठेवींचा वापर कमी करत आहेत.

अशा परिस्थितीत बँकांना ठेवी वाढवण्यासाठी आणि तरलतेशी संबंधित जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरणे स्वीकारावी लागतील. गेल्या काही वर्षांत, लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवत आहेत. SIP च्या माध्यमातून ते दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT