Ashneer Grover Sakal
Personal Finance

Ashneer Grover: अशनीर ग्रोवरची क्रिकेटमध्ये एंट्री! क्रिकेट फॅन्टसी स्पोर्ट्स अॅप केले लाँच

इंडियन प्रिमियम लीग (IPL) आठवडाभरात सुरू होणार असताना ग्रोवरने हे अॅप सादर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ashneer Grover: BharatPe चे सह-संस्थापक अशनीर ग्रोवरने नवीन क्रिकेट फॅन्टसी स्पोर्ट्स अॅप (Cricket Fantasy App) सादर केले आहे. इंडियन प्रिमियम लीग (IPL) आठवडाभरात सुरू होणार असताना ग्रोवरने हे अॅप सादर केले आहे. ग्रोव्हरने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

गुरुवार, 23 मार्च रोजी एका ट्विटद्वारे याबद्दल माहिती देताना सांगितले की, Google Play Store आणि Apple Store वरून डाउनलोड करण्यासाठी लिंक देखील शेअर केल्या आहेत. अशनीर ग्रोव्हर आता फॅन्टसी अॅपमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे कमवण्याच्या तयारीत आहे.

अशनीर ग्रोवरने CrickPe केले लाँच :

अशनीर ग्रोवरने कॅप्शनमध्ये लिहिले की, आयपीएलपासूनच क्रिकेटमध्ये मोठी क्रांती झाली आहे. CricketPe लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये या अॅप्लिकेशनची सविस्तर माहिती दिली आहे.

ट्विट करून त्याने लिहिले की, हे भारतातील सर्वात अनोखे आणि शक्तिशाली फॅन्टसी क्रिकेट गेमिंग अॅप आहे, जिथे क्रिकेट दररोज जिंकते! हे जगातील एकमेव क्रिकेट अॅप आहे जिथे वास्तविक खेळणारे वापरकर्ते, संघ मालक प्रत्येक सामन्यात बक्षिसे जिंकतात.

या क्षेत्रात आधीच अनेक कंपन्यांचे वर्चस्व आहे. यात ड्रीम 11, माय सर्कल 11 सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे आणि लाखो वापरकर्ते जोडले आहेत. अशा परिस्थितीत अशनीर   ग्रोवरसाठी हा मार्ग सोपा नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT