fund sakal
Personal Finance

म्युच्युअल फंड : मल्टीअ‍ॅसेट गुंतवणुकीचा विचार का करावा?

सोप्या भाषेत सांगायचे, गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतो,

सकाळ वृत्तसेवा

अश्‍विन शहा

भविष्यातील उद्दिष्टांसाठी आर्थिक नियोजन करताना गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव आवश्यक असतो. त्यासाठी गुंतवणूकदार जेव्हा दीर्घकालीन जोखमीचे व्यवस्थापन केलेले पर्याय शोधतात, तेव्हाच हे शक्य असते. गुंतवणुकीशी निगडित जोखीम घटकांची काळजी घेतली, तर दीर्घकालीन परतावा खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओतील जोखीम कमी करण्याच्या धोरणाला प्राधान्य देणे गरजेचे असते. यासाठी मल्टिअॅसेट गुंतवणुकीचा दृष्टिकोन उपयुक्त ठरतो.

गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण

सोप्या भाषेत सांगायचे, गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतो, अशा गुंतवणूक धोरणाला मल्टिअॅसेट गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. मालमत्तेचे एकवटलेपण नियंत्रणात ठेवून जोखमीचे घटक कमी करणे, या तत्त्वावर ते कार्य करते. विविध मालमत्ता वर्गांचे वेगवेगळे बाजारपेठेचे चक्र असते. म्हणूनच सर्व मालमत्ता वर्गांमध्ये पसरलेला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असल्यास, विशिष्ट मालमत्ता वर्ग दबावाखाली आल्याने निर्माण होणाऱ्या नकारात्मक धक्क्यांपासून गुंतवणूकदारांचे रक्षण होते.

बाजारपेठा वेगवेगळ्या जोखमीच्या अधीन असतात. हे जोखमीचे घटक मॅक्रो, मायक्रो, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असू शकतात. इक्विटी, डेट, कमोडिटीज आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक असल्यास आपल्याला सर्व मालमत्ता वर्गांचे एकत्रित फायदे मिळतात. त्यामुळे जोखीम कमी होते आणि कमाल परतावा मिळतो. प्रत्येक मालमत्ता वर्ग परिस्थितीला एकाच प्रकारे प्रतिसाद देत नाही. काहींमध्ये दुर्बलता दिसू शकते, तर काही लवचिकतेच्या आधारे सकारात्मक कामगिरी करतात. येथेच मल्टिअॅसेट गुंतवणुकीचे धोरण प्रभावीपणे कार्यरत होते आणि दीर्घकाळापर्यंत तुलनेने स्थिर परतावा देते.

मल्टिअॅसेट म्युच्युअल फंड

बाजारपेठेतील संकट आणि अनिश्चिततेतही गुंतवणूकदार मल्टिअॅसेट गुंतवणुकीमुळे यशस्वी होतात, ही वस्तुस्थिती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे. या रणनीतीचा फायदा घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मल्टिअॅसेट म्युच्युअल फंडांची निवड करणे.

हा हायब्रीड श्रेणीतील गुंतवणूक पर्याय असून, त्यामध्ये गुंतवणूकदाराला एकाच फंडात तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये प्रवेश मिळतो. अशा फंडांचे व्यावसायिक व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार वितरण बदलण्याची त्यांची क्षमता यामुळे गुंतवणूकदारांचा वेळ आणि ऊर्जा वाचते.

मल्टिअॅसेट श्रेणीतील एक सर्वांत जुना फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टिअॅसेट म्युच्युअल फंड. या फंडाचा २१ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्याने आपल्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा दिला आहे. याच्या स्थापनेच्या वेळी १० लाख रुपयांची असलेली गुंतवणूक आता ५.५ कोटी रुपयांची असेल.

(लेखक पेलिकन इन्व्हेस्टमेंट

लि.चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT