Asia Cup 2023 Sakal
Personal Finance

Asia Cup 2023: एका मॅचचे रोहित-कोहलीला मिळतात एवढे पैसे? बाकीच्यांनाही....!

Asia Cup 2023: आशिया कपमधून खेळाडूंना किती पैसे मिळतात?

राहुल शेळके

Asia Cup 2023: आशिया कप 2023 यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत हे सामने होणार आहेत.

भारतीय संघातील खेळाडूंना मानधन किती?

भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार मानधन दिले जाते. त्यांचे वार्षिक वेतन हे ग्रेडवर अवलंबून असते. प्रत्येक ग्रेडसाठी काही अटी आहेत. सध्या भारतीय संघात 4 ग्रेड आहेत A+, A, B आणि C. A+ ग्रेडमध्ये 4 खेळाडू आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जमप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा.

हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे A ग्रेडमध्ये आहेत. B ग्रेडमध्ये 6 खेळाडू आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, के.एल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल.

C ग्रेडमध्ये समाविष्ट खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत – उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि के.एस. भारत.

या खेळाडूंचा एक वर्षाचा करार 23 सप्टेंबर रोजी संपत आहे. A+ ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये, B ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि C ग्रेडमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये वार्षिक करारानुसार दिले जातात. या सर्व खेळाडूंना प्रत्येक सामना खेळण्यासाठी वेगळे मानधन दिले जाते.

कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 साठी वेगवेगळे मानधन दिले जाते. खेळाडू कोणत्याही ग्रेडमध्ये असला तरी त्याला प्रत्येक सामन्यात समान वेतन मिळते. या खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मानधन दिले जाते.

आशिया कपमधून खेळाडूंना किती पैसे मिळतात?

संघ किती सामने खेळतो आणि ते सामने कोणते खेळाडू खेळतात यावर आशिया कप स्पर्धेतील खेळाडूंची कमाई अवलंबून आहे. जर एखादा खेळाडू कोणत्याही सामन्यात नसेल तर त्याला त्या सामन्याचे मानधन मिळत नाही.

आशिया कपमध्ये भारताला किमान 5 सामने खेळायचे आहेत. जर एखाद्या खेळाडूने हे पाच सामने खेळले तर त्याला या स्पर्धेतून किमान 30 लाख रुपये मिळतात. जर भारताने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली आणि ते खेळाडू त्या 2 सामन्यांमध्ये देखील खेळले तर ही रक्कम 42 लाख रुपयांपर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Local: लोकलसंदर्भात मोठी अपडेट! पुणे स्टेशनवरुन लोकल ट्रेन सुटणार नाहीत

Mumbai : ICUत बेड नसल्यानं स्ट्रेचरवर ठेवलं, खाली पडून तरुणीचा मृत्यू; तर आणखी एका रुग्णानेही बेड अभावी गमावला जीव

MS Dhoni: यंदा न खेळताच धोनीची ‘आयपीएल’मधून निवृत्ती? अखेरच्या मोसमाची शक्यता

Bidkin Crime DMIC: बिडकीन DMIC परिसरात दोन तरुणांचे मृतदेह; विषारी औषधाची बाटली आढळल्याने संशय, तपास सुरू..

Latest Marathi News Live Update : नाना पटोले यांना काही काळ विमानतळाच्या गेटवर थांबवून ठेवलं

SCROLL FOR NEXT