Astral Pipes Sakal
Personal Finance

ॲस्ट्रल (शुक्रवारचा बंद भाव : रु. २,०७५)

ॲस्ट्रल लि. ही सीपीव्हीसी पाइपनिर्मिती व वितरण क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.

भूषण गोडबोले, सीए

ॲस्ट्रल लि. ही सीपीव्हीसी पाइपनिर्मिती व वितरण क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. सध्या कंपनी ॲडेसिव्ह, पेंट्स, नळ, सॅनिटरीवेअर आदी बांधकाम साहित्य उत्पादन आणि वितरण व्यवसायातदेखील विस्तार करत आहे. जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने ११३ कोटी रुपये नफा कमविला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १८ टक्के वाढ नोंदवली आहे.

मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील १,२६८ कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीचा महसूल सुमारे आठ टक्के वाढून १,३७० कोटी रुपये झाला आहे. मागील तीन तिमाही निकालानुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे ३६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीचा अत्याधुनिक दाहेज प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे ऊर्जेची बचत; तसेच खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीस सकारात्मक परिणाम मिळत आहे. ॲस्ट्रल सीपीव्हीसी आणि ॲस्ट्रल ‘ग्रेन-प्रो’ उत्पादनांना ‘ग्रीन-प्रो’ प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ग्राहकांना इको-फ्रेंडली उत्पादने खरेदी करण्यासाठी माहितीपूर्ण निवड करण्यात मदत करते.

कंपनी धोरणात्मक दृष्टीने उत्पादन क्षमतेत वाढ करत आहे. यावर्षी जानेवारीमध्ये कंपनीने गुवाहाटी येथील ग्रीनफिल्ड प्रकल्पामध्ये काम सुरू केले आहे. जून २०२४ पर्यंत हैदराबादमधील ग्रीनफिल्ड पाइप प्रकल्पामध्ये; तसेच जून २०२५ पर्यंत कानपूरमध्येदेखील मागणीनुसार टप्प्याटप्प्याने उत्पादन सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

हैदराबाद प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील उत्पादनक्षमता ४० हजार मेट्रिक टन असेल, तर दुसऱ्या टप्प्याची क्षमता सुमारे ३० हजार मेट्रिक टन असेल. कानपूर प्रकल्पदेखील पहिल्या टप्प्यात सुमारे ३० हजार मेट्रिक टन क्षमतेसह जून २०२५ पर्यंत कार्यरत होईल. धोरणात्मक दृष्टीने केलेली उत्पादन क्षमतावाढ, नावीन्यपूर्ण उत्पादने, मजबूत वितरण जाळे आदी बाबी कंपनीला स्पर्धात्मक वैशिष्ट्य प्रदान करत आहेत.

कर्जाचे प्रमाण कमी ठेवून व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनीने विक्री आणि नफ्यातही गेल्या १० वर्षांत प्रतिवर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. नफ्याची धंद्यात पुन्हा गुंतवणूक करून कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे.

जानेवारी २०२२ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. गेल्या आठवड्यात २,०७५ रुपयांवर बंद भाव देऊन या शेअरने दीर्घावधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता दीर्घावधीसाठी या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT