Avenue Supermarts Limited DMart Net Profit Up 22 percent Shares Up Sakal
Personal Finance

एवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या (DMart) नेट प्रॉफिटमध्ये 22% वाढ, शेअर्समध्येही तेजी...

एवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने अर्थात डीमार्टने (DMart) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

एवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने अर्थात डीमार्टने (DMart) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 22.39 टक्क्यांनी वाढून 563 कोटी झाला आहे.

एव्हेन्यू सुपरमार्ट्स डी-मार्ट स्टोअरची मालकी आणि संचालन करते. यासोबतच गेल्या वर्षभरात शेअरच्या किमतीतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा 460 कोटी होता. मार्च तिमाहीत त्याचे एकूण उत्पन्न वाढून 12,727 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या तिमाहीत 10,594 कोटी रुपये होते अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2022-23 मधील 2,378 कोटीवरून 2,536 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न वाढून 50,789 कोटी झाले होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षात 42,840 कोटी होते.

एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स 3 मे रोजी 13.40 रुपयांनी (0.29%) वाढले. यासह एनएसईवर हा शेअर 4618.45 रुपयांवर बंद झाला. यासोबतच गेल्या पाच दिवसांत शेअरने 1 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

तर एका महिन्यात स्टॉक रिटर्न सपाट झाला आहे. याशिवाय, स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 28% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. यासह, एनएसईवर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4890 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 3352 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT