Axis Bank Sakal
Personal Finance

Axis Bank: अ‍ॅक्सिस बँक लॉन्च करणार भारतातील पहिले नंबरलेस क्रेडिट कार्ड, असे आहेत फायदे

Fibe Axis Bank Numberless Credit Card: भारतातील पहिले नंबरलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी बँकेने फिनटेक कंपनीशी करार केला आहे.

राहुल शेळके

Fibe Axis Bank Numberless Credit Card: अ‍ॅक्सिस बँक आता बाजारात नंबरलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करणार आहे. भारतातील पहिले नंबरलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी बँकेने fintech Fibe यांच्याशी करार केला आहे. हे कार्ड सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

नंबरलेस क्रेडिट कार्डमध्ये ग्राहकांच्या कार्डवर कोणताही नंबर असणार नाही, त्याची कोणतीही एक्सपायरी तारीख नसेल किंवा कार्डवर कोणताही CVV नंबर नसेल.

या कार्डवर कार्ड मालकाची ओळख असणार नाही, ज्यामुळे कार्डच्या बेकायदेशीर वापराची शक्यता कमी होते. कार्डवर कोणताही क्रमांक नसल्यामुळे, ग्राहकाला सुरक्षा आणि गोपनीयतेचे फायदे मिळतात. Fibe अ‍ॅपवर ग्राहक त्यांच्या Fibe Axis Bank क्रेडिट कार्डची मागणी करु शकतात.

Fibe Axis Bank क्रेडिट कार्डचे फायदे:

  • सर्व प्रकारच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऑर्डरवर 3 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.

  • तुम्हाला राइड अॅप्सवरील स्थानिक प्रवासावर 3 टक्के कॅशबॅक मिळेल.

  • ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर 3 टक्के कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

  • याशिवाय, ग्राहकांना सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहारांवर 1 टक्के कॅशबॅक मिळतो.

  • रुपेद्वारे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची सुविधा.

  • सर्व व्यवहार डिजीटल प्लॅटफॉर्मवरून केले जातात असे नाही तर हे कार्ड सर्व ऑफलाइन स्टोअर्सवरही स्वीकारले जाते.

  • ग्राहकांच्या सोयीसाठी यावर टॅप आणि पे फिचर देखील आहे.

कार्डची फी किती आहे?

हे क्रेडिट कार्ड RuPay प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची सुविधा मिळणार आहे. सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, हे कार्ड सर्व ऑफलाइन स्टोअरवर देखील काम करेल. याव्यतिरिक्त, या कार्डावर शून्य वार्षिक शुल्क असणार आहे. हे कार्ड Fibe च्या 21 लाखांहून अधिक ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT