Axis Bank Q4 Results  Sakal
Personal Finance

Axis Bank : ॲक्सिस बँकेला तिमाहीत ७,१३० कोटींचा नफा

ॲक्सिस बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ७,१३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ॲक्सिस बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ७,१३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या मार्च तिमाहीत बँकेला सिटी बँकेचा भारतीय ग्राहक विभाग विकत घेतल्यानंतर ५,७६२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

बँकेचा संपूर्ण वर्षाचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ९,५८० कोटी रुपयांच्या तुलनेत २४,८६१ कोटी रुपये होता. संचालक मंडळाने दोन रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरमागे एक रुपया लाभांशाची शिफारस केली आहे.

ॲक्सिस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या ११,७४२ कोटी रुपयांच्या तुलनेत ११.४७ टक्क्यांनी वाढून १३,०८९ कोटी रुपये झाले आहे. बँकेचे एकूण थकीत कर्जांचे प्रमाण (एकूण एनपीए) १.४३ टक्के नोंदवले गेले आहे.

मागील वर्षीच्या कालावधीतील ‘एनपीए’च्या तुलनेत त्यात २.०२ टक्क्यांनी घट झाली आहे, तर निव्वळ एनपीए ०.३१ टक्के असून, तो मार्च २०२३ तिमाहीत ०.३९ टक्के होता. बँकेने कर्जासाठीची तरतूद आणि आकस्मिकता खर्चासाठी ११८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाने कर्जरोख्यांद्वारे ३५ हजार कोटी रुपयांच्या आणि शेअर विक्रीद्वारे २० हजार कोटी रुपयांच्या निधी उभारणीस मंजुरी दिली आहे, असे बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

'दारू-सिगरेट पीते', शिल्पा शेट्टीबद्दल सासऱ्यांची धक्कादायक वक्तव्य, राज कुंद्राचा खुलासा

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

SCROLL FOR NEXT