gautam adani Sakal
Personal Finance

Adani Capital: अदानी समूहाचे 'अच्छे दिन' संपले! फायनान्स कंपनी काढली विक्रीला, 'ही' विदेशी कंपनी खरेदीत आघाडीवर

गौतम अदानी यांच्याकडे कंपनीचा 90 टक्के हिस्सा आहे.

राहुल शेळके

Adani Capital: अदानी समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी अदानी कॅपिटलचे स्टेक विकत घेण्यासाठी 3 परदेशी कंपन्या पुढे सरसावत आहेत. बँक खरेदी करण्यासाठी विदेशी वित्त कंपनी बेन फ्रंटरनर आघाडीवर असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गौतम अदानी यांच्याकडे अदानी कॅपिटलमध्ये 90 टक्के आणि कंपनीच्या व्यवस्थापनाचा भाग असलेले गुंतवणूकदार गौरव गुप्ता यांच्याकडे 10 टक्के हिस्सा आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी 7 वर्षांपूर्वी अदानी कॅपिटल सुरू केली. अदानी कॅपिटल ग्राहकांना आर्थिक सुविधा पुरवते. इकॉनोमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार आता ही कंपनी विकली जाणार आहे.

अदानी कॅपिटलच्या व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आणि लेहमन ब्रदर्स आणि मॅक्वेरी येथील माजी गुंतवणूक बँकर गौरव गुप्ता या अधिग्रहणाचे नेतृत्व करत आहेत.

अहवालानुसार, विदेशी वित्त कंपनी बेन फ्रंटरनर अदानी कॅपिटलला 1,500 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कारण, Bain Frontrunner अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी Bain Capital पुढील फेरीत चर्चेत आहे.

10 जुलै रोजी पहिल्यांदा अहवाल दिला होता की बेन, कार्लाइल आणि सेर्बरस कॅपिटल हे तीन खाजगी इक्विटी समूह अदानी कॅपिटलचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहेत.

गौतम अदानी यांचा कंपनीत 90 टक्के हिस्सा आहे.

वृत्तानुसार, अदानी समूह फायनान्स कंपनी अदानी कॅपिटलचे अधिग्रहण करून आपल्या व्यावसायिक हितसंबंधांची पुनर्रचना करू पाहत आहेत आणि रोख बचत करून मुख्य पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.

अदानी कॅपिटलची 90 टक्के हिस्सेदारी गौतम अदानीकडे आहे आणि 10 टक्के हिस्सेदारी गौरव गुप्ता यांच्याकडे आहे. 2016 मध्ये ते अदानी ग्रुपमध्ये सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT