Bajaj Auto Sakal
Personal Finance

Bajaj Auto : जगभरात बजाज ऑटोचा डंका ! पहिल्या तिमाहीत १९४१ कोटींचा नफा; आफ्रिकेतील निर्यात महसूल दुहेरी अंकात

बजाज ऑटोने आर्थिक वर्ष २०२४-२५च्या पहिल्या तिमाहीत १९४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, यात वार्षिक १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बजाज ऑटोने आर्थिक वर्ष २०२४-२५च्या पहिल्या तिमाहीत १९४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, यात वार्षिक १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या एकत्रित महसुलातही १६ टक्क्यांनी वाढ होऊन तो ११,९३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मजबूत वाहन विक्री, स्पेअरमधून विक्रमी कमाई आणि देशांतर्गत व निर्यात दोन्ही व्यवसायांमध्ये वाढ, यामुळे महसूल वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मोटारसायकल, व्यावसायिक वाहने आणि इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमध्ये सातत्यपूर्ण वाढीमुळे बजाज ऑटोचा देशांतर्गत व्यवसाय सलग नवव्या तिमाहीत दुहेरी अंकांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४च्या पहिल्या तिमाहीतील सहा टक्क्यांच्या तुलनेत या तिमाहीत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा देशांतर्गत विक्री हिस्सा १४ टक्के आहे.

लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठेने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे, तर आफ्रिका आणि आशियातील निर्यात महसूलही दुहेरी अंकात वाढला आहे. बजाज ऑटोकडे १६,७६४ कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. मजबूत मुक्त रोख प्रवाह कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT