Bajaj Housing IPO sakal
Personal Finance

Bajaj Housing IPO : ‘बजाज हाउसिंग’ आणणार आयपीओ;चार हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

बजाज फायनान्सची उपकंपनी असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सच्या संचालक मंडळाने आज चार हजार कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’ला मंजुरी दिली आहे. कंपनीने ही माहिती शेअर बाजारांना कळवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बजाज फायनान्सची उपकंपनी असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सच्या संचालक मंडळाने आज चार हजार कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’ला मंजुरी दिली आहे.  कंपनीने ही माहिती शेअर बाजारांना कळवली आहे. संबंधित मंजुऱ्या, नियामकांची संमती आणि अन्य बाबींच्या अधीन राहून हा ‘आयपीओ’ बाजारात येईल.

बजाज हाउसिंग फायनान्स ही मोठी बिगरबँकिंग वित्तसंस्था असून, तिचे आठ कोटी छत्तीस लाख ग्राहक देशभरात आहेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘बजाज हाउसिंग फायनान्स’तर्फे नवी घरखरेदी, घराचे नूतनीकरण किंवा व्यापारी जागांची खरेदी यासाठी नागरिकांना किंवा कंपन्यांना कर्जे दिली जातात.

वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी मालमत्ता तारण ठेवूनही कर्जे दिली जातात. व्यवसायवाढीसाठी किंवा खेळत्या भांडवलाच्या उभारणीसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवूनही कर्जे दिली जातात.

निवासी आणि व्यापारी जागा विकसित करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांनाही कंपनी अर्थसाह्य देते. ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेतर्फे ‘बजाज हाउसिंग फायनान्स’ला दीर्घकालीन कर्जांसाठी ‘एएए-स्टेबल’ हा सर्वोच्च मानांकन दर्जा देण्यात आला आहे, तर लघुकालीन कर्जांसाठी‘ ए वन प्लस’ दर्जा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT