RBI Sakal
Personal Finance

Banks charge: बँक खात्यातून दरमहिन्याला इतके पैसे कापले जातात, जाणून घ्या कुठे जातात तुमचे पैसे?

Bank Account Charges: बँक ग्राहकांकडून कोणते शुल्क घेते?

राहुल शेळके

Bank Account Charges: आजच्या काळात प्रत्येकाचे बँक खाते आहे. अजूनही देशातील काही लोकांचे बँक खाते नाही. प्रधानमंत्री जन-धन योजनेनंतर देशातील अनेकांनी बँक खाती उघडली आहेत. या योजनेनंतर देशातील जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे.

बँका आपल्या खात्यातून पैसे कापतात हे आपण सर्वांनी अनेकदा पाहिले असेल. अशा परिस्थितीत बँका आपल्या खात्यातून कधी आणि किती वेळा पैसे कापतात हे आपल्याला माहित असले पाहिजे. बँक ग्राहकांकडून कोणते शुल्क घेते?

देखभाल शुल्क

सर्व बँक खाती सुरळीत चालवण्यासाठी बँक ग्राहकाकडून देखभाल शुल्क घेते. सर्व बँकांमध्ये हे दर वेगवेगळे आहेत. बँकेच्या नियम आणि अटींद्वारे तुम्ही या शुल्काविषयी जाणून घेऊ शकता.

डेबिट कार्ड शुल्क

खाते उघडताना बँक ग्राहकाला डेबिट कार्ड देते. या कार्डसाठी बँक ग्राहकांकडून शुल्क आकारते. हे शुल्क वार्षिक आधारावर घेतले जाते.

जर एखाद्या ग्राहकाला डेबिट कार्ड नको असेल तर त्याने बँकेकडून डेबिट कार्ड घेऊ नये. याशिवाय तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर तुम्ही एकच डेबिट कार्ड घ्यावे.

एटीएम चार्ज

जेव्हाही आपण दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरतो तेव्हा त्यासाठी एटीएमचे शुल्क भरावे लागते. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या बँकेतून तुम्ही महिन्यातून 4 वेळा पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

खात्यात कमी शिल्लक

तुमच्या खात्यातील रक्कम किमान ठेवीपेक्षा कमी असल्यास बँक तुमच्याकडून शुल्क आकारते. जर खात्यात किमान शिल्लक असेल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

डिजिटल पेमेंट शुल्क

जेव्हा तुम्ही UPI, IMPS, RTGS, NEFT सारख्या डिजिटल माध्यमातून पेमेंट करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागते.

खाते बंद करण्याचे शुल्क

जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक त्याचे खाते बंद करतो तेव्हा बँक त्याच्याकडून शुल्क आकारते. अशा परिस्थितीत खाते बंद करण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

बँक खाती दोन प्रकारची असतात

कोणताही ग्राहक देशात दोन प्रकारची खाती उघडू शकतो. सामान्य लोक बचत खाते उघडू शकतात. या खात्याला बचत खाते असेही म्हणतात.

ज्या व्यक्ती किंवा संस्था व्यवसाय करतात किंवा ज्यांचे व्यवहार खूप जास्त आहेत. ते चालू खाते उघडू शकतात. झिरो बॅलन्समध्येही अनेक बचत खाती उघडता येतात. बँक तुमच्या प्रत्येक खात्यावर शुल्क आकारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT