RBI  Sakal
Personal Finance

Bank Account: ...नाहीतर तुमचे खाते होईल बंद, लगेचच करा हे काम, RBI ने जारी केले परिपत्रक

Bank Account: बँक खाते बंद केले तर ग्राहकांनी काय करावे?

राहुल शेळके

Bank Account: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांचे KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. म्हणून बँका ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यास सांगतात. जर एखाद्या ग्राहकाने केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे खाते निलंबित केले जाईल. केवायसी अपडेट न केल्यामुळे, तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. तसेच, तुम्हाला बँक खात्यातील पैसेही काढता येणार नाहीत.

प्रत्येक ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया वेगळी असते. उदाहरणार्थ, बँक खात्यात जास्त रक्कम असलेल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी केवायसी, बँक खात्यात कमी रक्कम असलेल्या ग्राहकांना दर 8 वर्षांनी किंवा 10 वर्षांतून एकदा केवायसी करावं लागेल.

KYC बद्दल रिझर्व्ह बँकेने जारी केले परिपत्रक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 29 मे 2019 रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार, जर एखाद्या बँक ग्राहकाने त्यांचा पॅन क्रमांक, फॉर्म 16 किंवा बँकेने सांगितलेली कोणतीही कागदपत्रे सादर केली नसतील तर त्यांचे खाते निलंबित केले जाईल. मात्र, तसे करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती दिली जाईल.

बँक खाते पुन्हा चालू कसे करावे?

केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुमचे खाते बंद होऊ शकते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, खाते पुन्हा चालू करण्याची प्रक्रिया सर्व बँकांमध्ये सारखीच आहे. तुम्ही तुमचे खाते कसे चालू करू शकता ते जाणून घेऊया.

तुम्ही तुमचे खाते तीन प्रकारे चालू करू शकता

तुमचे खाते बंद केले असल्यास, तुम्ही तुमचे खाते तीन प्रकारे चालू करू शकता. तुम्हाला या तीनपैकी एका मार्गाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

बँक ऑफ बडोदाच्या मते, तुम्ही केवायसी कागदपत्रांसह तुमच्या बँक खात्याच्या शाखेला भेट देऊन आणि पुन्हा केवायसी फॉर्म भरुन प्रक्रिया पूर्ण करू शकता.

याशिवाय व्हिडिओ कॉलद्वारेही हे काम करता येणार आहे. तसेच, तुम्ही पोस्टाने बँकेचा फॉर्म भरून तो बँकेला पाठवून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT