Bank Employees Wage Hike Sakal
Personal Finance

Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट, आयबीए आणि बँक युनियनच्या बैठकीत पगारवाढीला मंजुरी

Bank Employees Wage Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ आणि आठवड्यातून 5 दिवस काम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.

राहुल शेळके

Bank Employees Wage Hike (Marathi News): बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यास सहमती दर्शविली आहे. (Bank employees to get 17 percent annual wage hike; 5-day work week awaits govt approval)

8 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या पगारवाढीचा फायदा जवळपास 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने एका नोटमध्ये म्हटले आहे की सुधारित कामाचे तास सरकारच्या अधिसूचनेनंतर लागू होतील.

आयबीए आणि बँक युनियनमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा 11 वा वेतन करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपला होता. तेव्हापासून बँक युनियन आणि आयबीए यांच्यात पगारवाढीबाबत चर्चा सुरू होती. इंडियन बँक्स असोसिएशनचे (IBA) अध्यक्ष ए के गोयल यांनी सांगितले की, बैठकीत 17 टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, याबाबतची पुढील आढावा बैठक आता नोव्हेंबर 2027 मध्ये होणार आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्हा सर्वांची साथ आणि सहकार्य आवश्यक आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

5 दिवसांच्या कामाची मागणी पूर्ण झाली नाही

बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सध्या त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. त्याची मंजुरी केंद्र सरकारकडूनच मिळू शकते, असे बँक असोसिएशनचे म्हणणे आहे.

बँक युनियन अनेक दिवसांपासून आठवड्यातून 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. सध्या आठवड्यातून 2 शनिवारी बँकांना सुटी असते, मात्र कर्मचाऱ्यांना 2 ऐवजी चारही शनिवारी सुट्टी हवी, असे वाटते.

केंद्राने अलीकडेच 50 लाख कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला आहे

केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए (महागाई भत्त्यात) वाढ केली आहे. 7 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्के करण्यात आला होता. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना तसेच 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही पगारवाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

महिला बँक कर्मचाऱ्यांना ही विशेष परवानगी मिळणार

नवीन वेतन करारानुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देताही दर महिन्याला एक दिवसाची आजारी रजा घेता येणार आहे.

बँकांची संघटना असलेल्या IBA चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आजचा दिवस बँकिंग उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

IBA आणि UFBU, AIBOU, AIBASM आणि BKSM यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेबाबत द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT