Bank Holiday in April 2024 Sakal
Personal Finance

Bank Holiday in April: एप्रिलमध्ये किती दिवस बँका बंद राहणार? RBIने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

Bank Holiday in April 2024: मार्च महिना संपत आला आहे आणि पुढील आठवड्यापासून एप्रिल 2024 महिना सुरू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

राहुल शेळके

Bank Holiday in April 2024: मार्च महिना संपत आला आहे आणि पुढील आठवड्यापासून एप्रिल 2024 महिना सुरू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयच्या यादीनुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँका बंद राहतील.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेत जाऊन कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एप्रिल 2024ची बँकांच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पहा. सुट्टीची यादी वेगवेगळ्या राज्यांमध्ये येणारे सण आणि वर्धापन दिनांनुसार तयार केली जाते.

एप्रिलमध्ये बँका कधी बंद राहतील?

  • 1 एप्रिल 2024: जेव्हा जेव्हा आर्थिक वर्ष संपते तेव्हा बँकेला संपूर्ण आर्थिक वर्षासाठी खाते बंद करावे लागते. त्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

  • 5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जुम्मत-उल-विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

  • 9 एप्रिल 2024: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

  • 10 एप्रिल 2024: कोची आणि केरळमध्ये ईदमुळे बँका बंद राहतील.

  • 11 एप्रिल 2024: ईदमुळे देशभरातील अनेक बँका बंद राहतील, परंतु चंदीगड, गंगटोक, इंफाळ, कोची, शिमला, तिरुअनंतपुरम येथील बँका खुल्या राहतील.

  • 15 एप्रिल 2024: हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमलामध्ये बँका बंद राहतील.

  • 17 एप्रिल 2024: रामनवमी 17 एप्रिल रोजी आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहतील.

  • 20 एप्रिल 2024: गर्या पूजेच्या निमित्ताने आगरतळामध्ये बँका बंद राहतील.

'या' दिवशी देशातील सर्व बँका बंद राहणार

प्रत्येक महिन्याच्या रविवारी, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवारी बँका बंद राहतात. एप्रिलमध्ये देशातील सर्व बँका 7 एप्रिल (रविवार), 13 एप्रिल (दुसरा शनिवार), 14 एप्रिल (रविवार), 21 एप्रिल (रविवार), 27 एप्रिल (चौथा शनिवार) आणि 28 एप्रिल (रविवार) रोजी बँका बंद राहतील.

ग्राहकांना या सुविधा मिळत राहतील

बँक बंद झाल्यानंतरही ग्राहकांना काही सुविधा मिळतात. ग्राहक मोबाइल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकिंग सेवा वापरू शकतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. याशिवाय ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे सहज पेमेंट करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT