Bank Holidays November 2023 Banks To Be Closed For Upto 15 Days In November, Check List  Sakal
Personal Finance

Bank Holidays November 2023: सणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays in November 2023: या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे.

राहुल शेळके

Bank Holidays in November 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये वीकेंडसह बँका 15 दिवस बंद राहतील. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसेच रविवारची सुट्टीही असणार आहे. जर तुम्ही पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काम करण्याचा विचार करत असाल तर आधी RBI चे कॅलेंडर तपासा.

नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा , छठ पूजा इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये या दिवशी बँका बंद राहतील

  • 1 नोव्हेंबर 2023- कन्नड राज्योत्सव बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.

  • 5 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी

  • 10 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दिवाळीनिमित्त बँका बंद राहतील.

  • 11 नोव्हेंबर 2023- दुसरा शनिवार

  • 12 नोव्हेंबर 2023- रविवार

  • 13 नोव्हेंबर 2023- लक्ष्मी पूजा/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.

  • 14 नोव्हेंबर 2023- अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी/ लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.

  • 15 नोव्हेंबर 2023- गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.

  • 19 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी

  • 20 नोव्हेंबर 2023- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.

  • 23 नोव्हेंबर 2023- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

  • 25 नोव्हेंबर 2023- चौथा शनिवार

  • 26 नोव्हेंबर 2023- रविवार

  • 27 नोव्हेंबर 2023- गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

  • 30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

ऑनलाइन व्यवहार चालू राहणार

देशातील अनेक सणांमुळे काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र, बँकिंग सेवा खंडित होणार नाही. ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. बँकाच्या सुट्टीच्या तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT