Home Loan EMI Esakal
Personal Finance

Loan Rates: महागाईचा झटका! देशातील 'या' 3 सरकारी बँकांनी व्याजदरात केली वाढ, तुमचे कर्ज होणार महाग

Loan Rates Increased: बँकांच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचेही टेन्शन वाढले आहे.

राहुल शेळके

Loan Rates Increased: बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी व्याजदरात वाढ केली आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्याचबरोबर बँकांच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचेही टेन्शन वाढले आहे.

कारण आता कर्जदारांच्या खिशावर पूर्वीपेक्षा व्याजाचा बोजा अधिक वाढला आहे. तसेच, त्यांना दीर्घ कालावधीसाठी ईएमआय भरावा लागेल.

मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतीही वाढ केलेली नाही. या आर्थिक वर्षातील एसपीसीच्या दुसऱ्या बैठकीत मोठा दिलासा देत त्यांनी रेपो दर स्थिर ठेवला. म्हणजेच RBI चा रेपो दर अजूनही 6.50 टक्क्यांवर कायम आहे.

विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात RBI ने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. असे असतानाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्याजदर वाढवले.

MCLR सुधारित 8.70 टक्के

बँकांच्या या निर्णयामुळे MCLR शी संबंधित मासिक हप्ते वाढतील. BoB ने शेअर बाजाराला सांगितले की एक वर्षाचा MCLR सुधारित करून 8.70 टक्के करण्यात आला आहे, तर पूर्वी तो 8.65 टक्के होता. विशेष म्हणजे नवीन व्याजदर 12 ऑगस्टपासून म्हणजेच शनिवारपासून लागू होणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रचे सुधारित दर 10 ऑगस्टपासून लागू

त्याचप्रमाणे कॅनरा बँकेनेही MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. आता कॅनरा बँकेचा MCLR वाढून 8.70 टक्के झाला आहे. तसेच 12 ऑगस्टपासून नवीन व्याजदर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रनेही व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे.

विशेष बाब म्हणजे व्याजदर वाढवल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने शेअर बाजाराला सांगितले की, त्यांचा MCLR एका वर्षात 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रचे सुधारित दर 10 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT