Bank of India Home Loan Scheme at lower interest rate finance Sakal
Personal Finance

Home Loan : ‘बँक ऑफ इंडिया’ची स्वस्त गृहकर्ज योजना

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने वार्षिक ८.३ टक्के या सर्वांत कमी व्याजदराने गृहकर्ज देत असल्याची घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने वार्षिक ८.३ टक्के या सर्वांत कमी व्याजदराने गृहकर्ज देत असल्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील इतर कोणत्याही बँकेच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा हे दर कमी आहेत.

ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली स्टार गृहकर्ज योजना ग्राहकांना कोणत्याही त्रासाविना कर्जाचा पर्याय उपलब्ध करून देते. या कर्जाची सुरुवात प्रति एक लाख रुपयासाठी प्रति महिना ७५५ रुपये एवढ्या कमी मासिक हप्त्याने सुरू होते. यात ओव्हरड्राफ्टची सुविधादेखील उपलब्ध आहे.

घराचे बांधकाम, नूतनीकरण आणि फर्निचर यासह स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठीही बँक घराच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठीही वित्तपुरवठा करते. गृहकर्जासाठी लागू असलेल्या व्याजदरानेच सौरऊर्जा प्रकल्पासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

याव्यतिरिक्त बँकेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी विशेष कर्जयोजनाही उपलब्ध केली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय वार्षिक सात टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. याशिवाय, ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंतच्या सरकारी अनुदानाचाही लाभ मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘बंडखोर फॅक्टर’! महायुती–महाविकासच्या रणनीतींना धक्का; सत्ता समीकरण बदलणार, किती उमेदवार मैदानात?

Latest Marathi News Live Update : नोटाचा अभ्यास आधी करा, पळून गेलेल्या उमेदवारांना जाब विचारा: दीपेश म्हात्रेंचा जोरदार पलटवार

Municipal Election: भिवंडी-निजामपूर पालिकेत सत्तासमीकरण बदलले! सपा गड ढासळला; काँग्रेस-भाजप-शिवसेनेची पकड मजबूत

Ravindra Chavan : "एबी फॉर्म वाटपातील चुकांची जबाबदारी माझीच"; नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची कबुली

SCROLL FOR NEXT