Bank of Maharashtra sakal
Personal Finance

Bank of Maharashtra : महाबँकेला १२१८ कोटींचा निव्वळ नफा ; एकूण व्यवसाय चार लाख ७४ हजार कोटी रुपयांवर

बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्च तिमाहीत १,२१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ८४० कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्च तिमाहीत १,२१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ८४० कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ झाली आहे.

या आर्थिक वर्षअखेर बँकेचा व्यवसाय जवळपास १६ टक्क्यांनी वाढून चार लाख ७४ हजार कोटी रुपयांवर गेला. आज त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. त्यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना यांनी ही माहिती दिली. बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे, रोहित ऋषी आणि महाव्यवस्थापक व मुख्य फायनान्शिअल अधिकारी व्ही.पी. श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४,०५५ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला २,६०२ कोटी रुपये नफा झाला होता. वर्षभरात व्याजउत्पन्न ७,७४१ कोटींवरून ९,८२२ कोटी रुपयांवर गेले आहे. मार्च तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजउत्पन्नही २,५८४ कोटी रुपये झाले असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १८.१७ टक्के वाढ झाली आहे.

बँकेचा एकूण व्यवसाय चार लाख ७४ हजार ४११ कोटींवर गेला असून, त्यात वार्षिक १५.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेवींचे प्रमाण १५.६६ टक्क्यांनी वाढून त्या दोन लाख ७० हजार ७४७ कोटींवर गेल्या आहेत, कर्ज व्यवसाय १६.३० टक्क्यांनी वाढून दोन लाख तीन हजार ६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. रिटेल, शेती, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित व्यवसायात वार्षिक २६.६९ टक्के वाढ झाली.

रिटेल कर्ज व्यवसाय ५१ हजार कोटींवर, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित कर्ज व्यवसाय ४२ हजार ११७ कोटींवर गेला. बँकेला थकीत कर्जांचे प्रमाण कमी करण्यात यश आले असून, ३१ मार्च २०२४ रोजी निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.२० टक्क्यांपर्यंत घटले आहे. एकूण एनपीएचे प्रमाण मार्च २०२३ मधील २.४७ टक्क्यांवरून १.८८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudflare Down: जगभरात इंटरनेट ठप्प, मेकमायट्रिप, कॅनव्हासह ट्रेडिंग प्लॅटफॉर्मही पडले बंद, सायबर क्राईम की, दुसरं काही...

MPSC Prelim Exam Updates: एमपीएससीची २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की ठरल्याप्रमाणेच होणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम!

Dhurandhar Review: रणवीर सिंगची करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स! धुरंधरची धमाकेदार सुरुवात! संजय दत्तचा एंट्रीला...

Babasaheb Ambedkar गेले 'तो' दिवस! 2 मिनटं वेळ काढून नक्की पाहा... अंगावर काटा येईल असा Video, कसा होता '6 December 1956'

TET Protest Kolhapur : टीईटी सक्तीविरोधातील आंदोलनात शिक्षक, पोलिसांमध्ये धक्काबुक्की, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात प्रकार

SCROLL FOR NEXT