RBI sakal
Personal Finance

RBI : मोठ्या मुदत ठेवींची मर्यादा वाढविल्याने बँकांना फायदा

बँकांतील मोठ्या मुदत ठेवींची मर्यादा सध्याच्या दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बँकांच्या मालमत्ता व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बँकांतील मोठ्या मुदत ठेवींची मर्यादा सध्याच्या दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बँकांच्या मालमत्ता व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सध्या व्यापारी बँका आणि लघू वित्त बँकांमधील दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवी किरकोळ ठेवी म्हणून गृहीत धरल्या जातात. तरलता व्यवस्थापनासाठी दोन कोटी रुपये किंवा त्याहून मोठ्या ठेवींची मदत होत असल्याने बँका अशा ठेवींवर अधिक व्याजदर देतात. काही वर्षांपूर्वी मोठ्या मुदत ठेवींची पातळी एक कोटी रुपयांच्यावर होती.

ती नंतर दोन कोटी आणि आता तीन कोटी रुपये करण्यात आली आहे. बँकांना मालमत्ता दायित्व व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता यावे, यासाठी ठेवींची मर्यादा वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे. यांनी म्हटले आहे. स्थानिक क्षेत्रीय बँकांसाठी ग्रामीण बँकांप्रमाणेच मोठ्या मुदत ठेवींची मर्यादा एक कोटी रुपये करण्याचा प्रस्तावही आहे, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने व्यवसायपूरक वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने परकी चलन विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) वस्तू व सेवांच्या आयात-निर्यातीचे नियम शिथिल करण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. परकी चलन विनिमय नियमांमध्येही शिथिलता आणली जाणार आहे. लवकरच याबाबतचा मसुदा अभिप्रायांसाठी जाहीर केला जाईल, असेही स्वामिनाथन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT