RBI Banks Charges Sakal
Personal Finance

Banks Charges: छोट्या चुका पडतात महाग, 'या' कारणांमुळे बँकांनी ग्राहकांकडून वसूल केला इतक्या हजार कोटींचा दंड

Banks Charges: सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षांत ग्राहकांकडून हजारो कोटी रुपये वसुल केले आहेत

राहुल शेळके

Banks Charges: सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षांत ग्राहकांकडून हजारो कोटी रुपये वसुल केले आहेत. हे पैसे बँकांनी ग्राहकांकडून गेल्या पाच वर्षांत एसएमएस, खात्यात किमान शिल्लक न ठेवणे आणि अतिरिक्त एटीएम व्यवहारांसाठी जमा केले आहेत.

2018 पासून पाच वर्षांत बँकांकडून एकूण 35,587 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यापैकी 21,044.04 कोटी रुपयांची सर्वात मोठी रक्कम बँकांकडून 2018 पासून खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड म्हणून घेण्यात आली आहे.

राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली माहिती

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील बँकांनी अतिरिक्त एटीएम व्यवहारांसाठी 8,289.32 कोटी रुपये आणि एसएमएस सेवा देण्यासाठी 6,254.32 कोटी रुपये खर्च केले आहेत.

प्रमुख खाजगी बँकांमध्ये अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआय बँक यांचा समावेश आहे.

आरबीआयने परिपत्रक जारी केले होते

बँकांकडून आकारल्या जाणार्‍या शुल्कांचे नियमन करण्यासाठी, RBI ने 1 जुलै 2015 रोजी 'बँकांमधील ग्राहक सेवा' वर एक परिपत्रक जारी केले होते. खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास दंडाचा निर्णय घेण्याची मुभा बँकांना आहे, अशी तरतूद यात करण्यात आली आहे.

RBI ने 10 जून 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बँक ग्राहक त्यांच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहारांसाठी पात्र आहेत.

ग्राहक इतर बँक एटीएममध्ये ठराविक संख्येने मोफत व्यवहारांसाठी देखील पात्र आहेत, म्हणजे मेट्रो शहरांमध्ये तीन व्यवहार आणि मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये पाच व्यवहार. विनामूल्य व्यवहारांव्यतिरिक्त, प्रत्येक एटीएम व्यवहारावर जास्तीत जास्त 21 रुपये शुल्क आकारले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT