Banks may have to slowdown loan growth in FY25 says S and P report  Sakal
Personal Finance

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

Bank Loan: 2024 हे वर्ष भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी नवीन आव्हाने निर्माण करू शकते. जागतिक रेटिंग एजन्सी S&P ने म्हटले आहे की बँकांना निधीची कमतरता भासत आहे, त्यामुळे कर्ज वितरणाची प्रक्रिया देखील या वर्षी मंद होऊ शकते.

राहुल शेळके

Bank Loan: 2024 हे वर्ष भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी नवीन आव्हाने निर्माण करू शकते. जागतिक रेटिंग एजन्सी S&P ने म्हटले आहे की बँकांना निधीची कमतरता भासत आहे, त्यामुळे कर्ज वितरणाची प्रक्रिया देखील या वर्षी मंद होऊ शकते. एजन्सीने म्हटले आहे की, बँका ज्या वेगाने कर्ज वितरण करत आहेत त्याच वेगाने ठेवी मिळत नाहीत. साहजिकच कर्ज वाटपासाठी पुरेशा निधीअभावी हे वर्ष सुस्त असू शकते.

एजन्सीने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात भारतीय बँकांची पत वाढ, नफा आणि मालमत्तेची गुणवत्ता चांगली राहील. ठेवी त्याच गतीने वाढत नसल्यामुळे त्यांना त्यांची कर्ज वाढ कमी करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

खाजगी बँकांनी जास्त कर्ज वाटप केले

सर्वसाधारणपणे, खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये पत वाढ सर्वाधिक झाली आहे. यामध्ये सुमारे 17-18 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) 12-14 टक्क्यांची पत वाढ झाली आहे. याचा अर्थ खाजगी बँकांनी अधिक कर्जे वितरित केली आहेत आणि FD सारख्या कमी ठेवीमुळे, ते वितरित करू शकणाऱ्या कर्जाचे प्रमाण कमी होऊ शकते.

FD वर व्याज वाढू शकते

बँकिंग तज्ञांचे म्हणणे आहे की लोक जास्त व्याजदरासह इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे बँकांसारखे पारंपरिक पर्याय कमी झाले आहेत. साहजिकच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांना एफडीवर अधिक व्याज द्यावे लागेल, तरच त्यांच्या ठेवी वाढतील आणि त्यांना कर्ज वाटप करता येईल. मात्र, बँकांनी असे केल्यास त्यांच्या निव्वळ नफ्यावरही परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT