Barclays plans 2,000 job cuts as part of 1.25 billion dollar cost-cutting plan  Sakal
Personal Finance

Barclays Layoffs: जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी

Barclays Layoffs: बार्कलेज बँकेत 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

राहुल शेळके

Barclays Layoffs: जगातील 10वी सर्वात मोठी बँक बार्कलेज मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार 1 अब्ज पौंड किंवा 1.25 अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान 2,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. बार्कलेज बँकेत 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना 333 वर्षांपूर्वी 1690 मध्ये झाली.

बार्कलेजने अलिकडच्या वर्षांत आपल्या बँकिंग व्यवसायांमध्ये बोनस कमी करून तसेच नोकऱ्या कमी करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. बार्कलेजचे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांनी सांगितले की, बँक येत्या काही दिवसांत एकूण अब्जावधी पौंडांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करत आहे.

या कपातीचा सर्वाधिक परिणाम बार्कलेज एक्झिक्युशन सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होईल, ज्यांना BX म्हणून ओळखले जाते.

भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या कर्मचारी कपातीचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या कर्मचारी कपातीचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटीश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे असे म्हटले जात आहे.

अहवालानुसार, 2017 मध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 20 हजार होती. 2022 च्या अखेरीस 22,300 पर्यंत पोहोचली. यामुळे बँकेचा कर्मचाऱ्यांवरील खर्च 1.8 अब्ज पौंडांवरून 2 अब्ज पौंड झाला आहे. आता बँकेला हा खर्च कमी करून एक अब्ज पौंड करायचा आहे. या कपातीचा केवळ ब्रिटन किंवा इतर देशांवर परिणाम होईल की नाही हे उघड झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT