Saarthi AI CEO Vishwa Nath Jha Sakal
Personal Finance

Layoffs: बॉसनं कामावरुन काढलं अन् पठ्ठ्या थेट पासपोर्ट घेऊन झाला पसार; सीईओने केला अजब दावा

Layoffs 2024: बेंगळुरूस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप Saarthi.ai अडचणींचा सामना करत आहे. स्टार्टअपवर आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नसल्याचा गंभीर आरोप होत आहे.

राहुल शेळके

Layoffs 2024: बेंगळुरूस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप Saarthi.ai अडचणींचा सामना करत आहे. स्टार्टअपवर आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नसल्याचा गंभीर आरोप होत आहे. निधी उभारण्याच्या प्रयत्नांदरम्यान, कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विश्वनाथ झा यांनी एक विचित्र दावा केला आहे.

ते म्हणाले की एका माजी कर्मचाऱ्याने त्यांचा पासपोर्ट चोरला, ज्यामध्ये यूएस व्हिसा होता. Saarthi.ai ने सप्टेंबर 2022 मध्ये नफा मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. यानंतर मार्च 2023 पासून 50 हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार थांबल्याचे बोलले जात आहे.

झा यांनी Entrackr ला दिलेल्या मुलाखतीत एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने त्यांचा पासपोर्ट चोरल्याचा आरोप केला आहे, ज्यामध्ये अमेरिकेचा महत्त्वाचा व्हिसा होता. झा यांचे म्हणणे आहे की त्यांनी नवीन पासपोर्ट काढला आहे, परंतु अद्याप त्यांना पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. या घटनेमुळे परदेशात जाऊन निधी उभारणीचे प्रयत्न थांबले आहेत.

50 हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

सध्याचे आणि माजी कर्मचारी मात्र वेगळीच गोष्ट सांगतात. Entrackr च्या म्हणण्यानुसार, एक माजी कर्मचारी म्हणतो, 'फर्मने 50 हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार एका वर्षापेक्षा जास्त काळ रोखले आहेत आणि कायदेशीर नोटिसांनाही उत्तर दिलेले नाही. आम्हाला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असेही संस्थापकांनी अनेक प्रसंगी सांगितले होते."

झा यांनी पगार न दिल्याचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आणि हा कंपनीच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सीईओने हे देखील कबूल केले आहे की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून TDS (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) जमा करण्यात अपयशी ठरली आहे. झा यांनी कर्मचारी कपातीचे कारण गुंतवणुकदारांचा दबाव असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT