PI Industries Limited
PI Industries Limited sakal
Personal Finance

पीआय इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,६४५)

भूषण गोडबोले

‘मेवाड ऑइल अँड जनरल मिल्स’ म्हणून १९४६ मध्ये स्थापित, सध्याची ‘पीआय इंडस्ट्रीज’ ही कृषी रसायन व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने ती करते. देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांमध्ये तिची मजबूत उपस्थिती आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने ४४९ कोटी रुपये नफा कमविला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे २७ टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील १,६१३ कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीचा महसूल सुमारे १७ टक्के वाढून १,८९८ कोटी रुपये झाला आहे.

मागील तीन तिमाही निकालांनुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे १,३१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नव्या उत्पादनांनी या तिमाहीत लक्षणीय योगदान दिले आहे. कंपनीच्या ‘पायरॉक्सासल्फोन’ या तणनाशकासाठी टोकियोस्थित ‘कुमियाई केमिकल’ ही कंपनी सर्वांत मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. कंपनीच्या एकूण महसुलात याचे योगदान लक्षणीय आहे.

पुढील काही वर्षांमध्ये, ‘पायरॉक्सासल्फोन’ अनेक बाजारपेठांमध्ये ‘ऑफ पेटंट’ होईल; मात्र कंपनीकडे जे संयोजन आणि फॉर्म्युलेशन पेटंट आहेत ते आणखी अनेक वर्षे वैध राहतील, त्यामुळे त्याचा फार प्रभाव जाणवणार नाही. एकदा ‘पायरोक्सासल्फोन’ जेनेरिक झाले, की जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या संधीचा लाभ घेण्यासाठी गेली आठ ते नऊ वर्षे या उत्पादनाशी परिचित असलेल्या ‘पीआय इंडस्ट्रीज’लादेखील संधी मिळू शकेल.

कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने निर्यातीसाठी चार; तसेच देशांतर्गत व्यवसायासाठी पाच नवी उत्पादने सादर केली आहेत. कृषी रसायन व्यवसायावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने उचलेले एक धोरणात्मक पाऊल म्हणून कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी; तसेच वाढीच्या नव्या क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने या वर्षी फार्मा ‘सीडीएमओ’ आणि ‘सीआरओ’ क्षेत्रात आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. आगामी चार ते पाच वर्षांत, बिगर कृषी-रसायन क्षेत्रामधून सुमारे २० ते २५ टक्के महसूल कमावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कंपनीवर जवळपास कर्जमुक्त असून, व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत आहे. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT