L & T Technology Services sakal
Personal Finance

स्मार्ट गुंतवणूक : एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस

‘एलटीटीएस’ अर्थात ‘एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ ही कंपनी एक अभियांत्रिकी सेवा प्रदाता आहे.

भूषण गोडबोले

‘एलटीटीएस’ अर्थात ‘एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ ही कंपनी एक अभियांत्रिकी सेवा प्रदाता आहे.

‘एलटीटीएस’ अर्थात ‘एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ ही कंपनी एक अभियांत्रिकी सेवा प्रदाता आहे. परिवहन, औद्योगिक उत्पादने, दूरसंचार, हाय-टेक, वैद्यकीय उपकरणे यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना ती अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास; तसेच डिजिटलायझेशन सोल्यूशन्स पुरवते. कंपनीच्या ग्राहकवर्गामध्ये ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यामधील जवळपास ६९ कंपन्या आहेत. यावर्षी ‘एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ या कंपनीने मूळ कंपनी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीकडून स्मार्ट सोल्यूशन्स आणि सायबर सिक्युरिटीमध्ये उपस्थिती असलेला कनेक्टेड इंटेलिजन्स सोल्यूशन प्रदाता ‘स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन’ (एसडब्लूसी) हा व्यवसाय विकत घेतला आहे.

कंपनी व्यवस्थापनानुसार या संपादनामुळे कंपनीला ‘फाइव्ह-जी’, डिजिटल उत्पादने आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रात वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. सध्या व्यापक ‘आयटी’ सेवा विश्वाच्या तुलनेत ‘ई आर अँड डी’ (इंजिनीअरिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंट) अर्थात अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास सेवांच्या वाढत्या आउटसोर्सिंगमुळे कंपनीच्या सेवांसाठी दीर्घकालीन मागणीचे वातावरण आहे.

वाहतूक आणि औद्योगिक उत्पादने उद्योगांसाठी अभियांत्रिकी सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीने गेल्या तिमाहीत एकूण एक कोटी डॉलरपेक्षा जास्त किमतीचे तीन करार मिळवले आहेत. फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या या करारांपैकी एकामध्ये शहरी रेल्वेसाठी खासगी ‘फाइव्ह जी’ नेटवर्क विकसित करण्यासाठी फ्रेंच तंत्रज्ञान कंपनी ‘थेल्स’ सोबत भागीदारी करणे समाविष्ट आहे; तसेच आणखी एक करार, जो महिन्यापूर्वी जाहीर झाला, त्यात विमान उत्पादक ‘एअरबस’ साठी अनेक वर्षे धोरणात्मक भागीदार बनणे समाविष्ट आहे.

विविध उद्योग विभागांमध्ये उपस्थिती असल्याने व्यवसायवृद्धीतील धोक्याचे परिणामकारक व्यवस्थापन करून कंपनी मागणी लक्षात घेऊन विकास आणि डिजिटलायझेशन सोल्यूशन्सचे उपायांचे क्रॉससेलिंग करत उद्योगात प्रगती करण्यास सक्षम आहे. सध्या मंदावलेल्या जागतिक वाढीच्या परिस्थितीमध्ये जगभरातील ‘कॉस्ट ऑप्टिमायझेशन ड्राइव्ह’मुळे (खर्च नियंत्रण) संरचनात्मक दृष्टिकोनातून भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

कंपनीने कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी केली आहे. सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीने ३११ कोटी रुपयांचा नफा कमविला आहे, तर वर्षभरात निव्वळ नफ्यात २२ टक्के वाढ नोंदवत १,१७४ कोटी रुपये नफा कमविला आहे. भागधारकांना कंपनी प्रति शेअर ३० रुपये अंतिम लाभांश देईल. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता या कंपनीच्या शेअर मध्ये बाजारातील चढ-उतार; तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन दीर्घावधीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT