schaeffler india sakal
Personal Finance

स्मार्ट गुंतवणूक : शेफलर इंडिया

शेफलर इंडिया लि. ही कंपनी हायप्रिसिजन रोलर, बॉल बेअरिंग्ज, इंजिन सिस्टीम, ट्रान्समिशन घटक, चॅसिस ॲप्लिकेशन्स, क्लच सिस्टीम आदींच्या उत्पादन आणि वितरणामध्ये गुंतलेली आहे.

भूषण गोडबोले

शेफलर इंडिया लि. ही कंपनी हायप्रिसिजन रोलर, बॉल बेअरिंग्ज, इंजिन सिस्टीम, ट्रान्समिशन घटक, चॅसिस ॲप्लिकेशन्स, क्लच सिस्टीम आदींच्या उत्पादन आणि वितरणामध्ये गुंतलेली आहे. ‘शेफलर’चे भारतात चार उत्पादन प्रकल्प आणि ११ विक्री कार्यालये असून, ‘एफएजी’, ‘आयएनए’ आणि ‘एलयूके’ तीन प्रमुख ब्रँड्ससह देशभरात लक्षणीय उपस्थिती आहे.

कंपनीने १९६४ मध्ये वडोदरा, गुजरात येथे पहिला कारखाना स्थापन केला. याठिकाणी बॉल बेअरिंग, रोलर बेअरिंग, व्हील बेअरिंगची निर्मिती होते व ‘एफएजी’ या ब्रँडअंर्तगत विक्री होते. सावली येथील दुसऱ्या कारखान्‍यात निर्माण होणाऱ्या ग्रूव्ह बॉल बेअरिंग व मोठ्या आकाराचे रोलर बेअरिंगची ‘एफएजी’ नावाने विक्री होते.

कंपनीचा तिसरा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे असून, तिथे फ्रंट ॲक्सेसरी ड्राईव्ह सिस्टीम, चेन ड्राइव्ह सिस्टीम, व्हॉल्व्ह ट्रेन आदी उत्पादने तयार होतात आणि ‘आयएनए’ ब्रँडअंतर्गत त्यांची विक्री होते. प्रवासी मोटारी, व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टरसाठी क्लच सिस्टीम व ड्युएल मास फ्लायव्हीलचे उत्पादन होसूर येथील चौथ्या कारखान्यात होते व ‘एलयूके’ ब्रँडअंतर्गत त्यांची विक्री होते.

सध्या जगात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यादृष्टीने कंपनीकडे एक मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ आहे. ‘शेफलर इंडिया’ने व्यवसायवृद्धीसाठी अलीकडेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बेंगळुरूस्थित ‘केआरएसव्ही इनोव्हेटिव्ह ऑटो सोल्युशन्स प्रायव्हेट लि. या कंपनीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या तीन वर्षांत तिने उत्तम व्यवसायवृद्धी केली आहे. ही कंपनी ताब्यात घेतल्यामुळे ‘शेफलर इंडिया’ला भारतीय वाहन बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यास मदत मिळेल.

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत कंपनीने १८२९ कोटी रुपये महसूल मिळवला असून, निव्वळ नफा २३७ कोटी रुपयांवर गेला आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यरत क्षेत्रात प्रगती करत आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT