Mutual Funds sakal
Personal Finance

Mutual Funds : ‘पीआयएफएए’मुळे गुंतवणूकदारांना मोठी मदत

पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल अॅम्बेसिडर्स असोसिएशन (पीआयएफएए) ही म्युच्युअल फंड वितरकांची संघटना गुंतवणूकदार आणि वितरकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असून, त्याचा दोन्ही घटकांना मोठा फायदा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल अॅम्बेसिडर्स असोसिएशन (पीआयएफएए) ही म्युच्युअल फंड वितरकांची संघटना गुंतवणूकदार आणि वितरकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असून, त्याचा दोन्ही घटकांना मोठा फायदा झाला आहे.

त्यांचे उपक्रम आदर्श ठरले असून, उद्योगात त्यांना चांगली मान्यता मिळाली आहे, असे गौरवोद्गार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यांनी काढले.

‘पीआयएफएए’तर्फे आयोजित सदस्यांच्या सन्मान समारंभात ते बोलत होते. यावेळी निमेश शाह यांच्या ‘स्ट्राईव्हिंग सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात या संघटनेच्या अनेक सदस्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. ते भविष्यातील आर्थिक सल्लागारांसाठी दीपस्तंभाचे काम करणार आहे. यावेळी आयसीआयसीआय प्रु.चे रिजनल हेड गौरव जाजू उपस्थित होते.

संघटनेने फंड वितरकांच्या कौशल्य आणि तांत्रिक विकासासाठी एक दशकापेक्षा अधिक काळ समर्पित वृत्तीने केलेल्या कार्यामुळे गुंतवणूकदारांना सर्वसमावेशक मार्गदर्शन मिळणे शक्य झाले आहे. परिणामकारक जोखीम व्यवस्थापन, सतत वाढ आणि ग्राहकांचा विश्वास कायम टिकवून ठेवणे ही यशाची गुरुकिल्ली आहे, असेही शाह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT