Income Tax Notice Sakal
Personal Finance

Income Tax Notice: पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सची नोटीस 2 कोटींची; बिहारी मजुराने लावला डोक्याला हात

Income Tax Notice: आयकर विभागाने एका गरीब मजुराला 2 कोटी रुपयांहून अधिक कराची नोटीस बजावली आहे. तेल व्यापाऱ्याकडे 10 हजार रुपये दरमहा मजूर म्हणून काम करणाऱ्या राजीवकुमार वर्मा यांना 2 कोटी 3 हजार 308 रुपयांचा कर भरण्याची नोटीस मिळाली आहे.

राहुल शेळके

Income Tax Notice: आयकर विभागाने एका गरीब मजुराला 2 कोटी रुपयांहून अधिक कराची नोटीस बजावली आहे. तेल व्यापाऱ्याकडे 10 हजार रुपये दरमहा मजूर म्हणून काम करणाऱ्या राजीवकुमार वर्मा यांना 2 कोटी 3 हजार 308 रुपयांचा कर भरण्याची नोटीस मिळाली आहे. नोटीसमध्ये 67 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, तो 2 दिवसांत भरण्यास सांगण्यात आले आहे. हे प्रकरण बिहारच्या गया जिल्ह्यातले आहे.

राजीवने कधीही आयकर विवरणपत्र भरले नाही हे उघड झाले आहे. एवढ्या कमी उत्पन्नात रिटर्न भरण्याची माहितीही त्यांना नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. 2015मध्ये जेव्हा राजीव यांनी कॉर्पोरेशन बँकेत 2 लाख रुपयांची एफडी केली होती. गरज होती म्हणून त्यांनी 2016 मध्ये ही एफडी मोडली.

यानंतर त्यांनी कोणतेही मोठे व्यवहार केले नाहीत. मात्र अचानक आयकर विभागाने 2 कोटी 3 हजार 308 रुपयांची कर नोटीस पाठवून त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. प्राप्तिकर विभागाचा आरोप आहे की राजीव यांनी 2015-16 मध्ये 2 लाख रुपयांची एफडी केली होती, ज्यावरील कर त्यांनी अद्याप भरलेला नाही.

22 जानेवारी 2015 रोजी कॉर्पोरेशन बँकेत 2 लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले होते, परंतु जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी 16 ऑगस्ट 2016 रोजी पैसे काढले. असे राजीव यांनी सांगितले.

प्राप्तिकर विभागाच्या नोटीस मिळाल्याने राजीव हे गोंधळात पडले होते. गेल्या 4 दिवसांपासून ते कामावर जाऊ शकले नाहीत. निराश होऊन त्यांनी गया येथील आयकर विभागाच्या कार्यालयात संपर्क साधला, जिथे त्यांना पाटण्याला जाण्यास सांगण्यात आले.

या प्रकरणाने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका गरीब माणसाला, ज्याचे उत्पन्न अत्यंत कमी आहे, त्याला 2 कोटींहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी पुढे काय कारवाई होते आणि राजीवला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT