Sunil Bharti Mittal  sakal
Personal Finance

Sunil Bharti Mittal : सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान ; ‘केबीई’ सन्मान मिळविणारे पहिले भारतीय

भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (केबीई) हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (केबीई) हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. हा सन्मान मिळवणारे सुनील मित्तल हे पहिले भारतीय नागरिक आहेत.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी किंग चार्ल्स यांनी मित्तल यांना हा सन्मान प्रदान केला आहे. ‘‘किंग चार्ल्स यांच्याकडून मिळालेल्या या सन्मानाने मी भारावून गेलो आहे. ब्रिटन आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत, जे आता वाढत्या सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत करण्यात योगदान देण्याकरिता मी वचनबद्ध आहे,’’ असे मित्तल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT