GDP  sakal
Personal Finance

GDP : ब्रिटन आणि जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत

सलग दोन तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) घटल्याने जपान आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सलग दोन तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) घटल्याने जपान आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे.

आता जर्मनी आता जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जपानची अर्थव्यवस्था सुमारे ४.३ लाख कोटी डॉलरची आहे. जपानचा ‘जीडीपी’ डिसेंबर २०२३ला संपलेल्या तिमाहीत ०.४ टक्क्यांवर आला, त्याआधीच्या ऑक्टोबर तिमाहीत ३.३ टक्क्यांनी घसरला होता. कमकुवत चलन, घटती लोकसंख्या अशा समस्यांमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होत आहे.

यापूर्वी २०१० मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे जपान दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला होता. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

ब्रिटनचा ‘जीडीपी’ ०.३ टक्के

ब्रिटनच्या सांख्यिकी विभागाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा ‘जीडीपी’ डिसेंबर २०२३ या तिमाहीदरम्यान ०.३ टक्के व सप्टेंबर तिमाहीत ०.१ टक्क्यांनी घसरला. डिसेंबर तिमाहीत बांधकाम, उत्पादनासह सर्व मुख्य क्षेत्रांमध्ये मंदी होती. ब्रिटनमध्ये महागाईदर जानेवारीमध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या दोन टक्क्यांच्या लक्ष्याच्या दुप्पट चार टक्के होता. महागाईला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT