Gold Rate  esakal
Personal Finance

Gold Rate In Maharashtra: अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोने खरेदीसाठी झुंबड, मुंबईत ५ हजारांनी घसरण तर पुणे, जळगाव किती?

Union Budget 2024 Gold Prices Decrease : अर्थसंकल्पात मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६% आणि प्लॅटिनमवरील ६.५% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

Sandip Kapde

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. आयात शुल्क सहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्यामुळे जळगावच्या बाजारात सोनं २५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात सोनं तीन हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. जळगावमध्ये आता सोनं ७०,७०० रुपये प्रति तोळा आहे, जीएसटीसह ७३,८०० रुपये आहे. तसेच, चांदीचा भाव ८७,००० रुपये असून जीएसटीसह ८९,६०० रुपये आहे.

आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे मुंबईत सोनं प्रति तोळा ५ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आता सोन्याचा भाव ७०,८६० रुपये प्रति तोळा झाला आहे.सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. "भाव कमी झाल्यामुळे आम्ही जादा सोनं खरेदी करू शकतो," अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

इंडस्ट्रीला बुस्ट देण्यासाठी निर्णय-या निर्णयामुळे इंडस्ट्रीला बुस्ट मिळणार आहे. भारतात जे सोनं बाहेरून येतं त्यावर कस्टम ड्यूटी लागायची, ती आता ६ टक्क्यांनी कमी झाली आहे. हे जवळजवळ ३६०० रुपयांचा फायदा होणार आहे, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

मुंबई गोल्ड अशोसियशनचे अध्यक्ष कुमार जैन म्हणाले, "स्टॅम ड्यूटी १५ टक्के होती ती कमी करून ६ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता जोरदार गर्दी केली आहे. खरेदी देखील वाढणार आहे."

विदर्भातील खामगावात दर काय?

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर खामगाव येथील प्रसिद्ध चांदी आणि सोन्याच्या बाजारपेठेत सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे. चांदीचा भाव काल प्रति किलो ९१६५० रुपये होता, तर आज तो ८४३३० रुपये प्रति किलोवर आला आहे. सोन्याचा भाव काल प्रति १० ग्रॅम ७३००० रुपये होता, तर आज तो ६८००० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. सोन्या-चांदीच्या भावात घट झाल्यानंतर खरेदीदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

अर्थसंकल्पात इतर निर्णय-

अर्थसंकल्पात मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६% आणि प्लॅटिनमवरील ६.५% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. कर्करोगाशी संबंधित तीन औषधांवर कस्टम ड्यूटी हटवली आहे. एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील आयात शुल्कही हटवण्यात आले आहे. मोबाईल फोन आणि पार्ट्सवर कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

वाढलेल्या खर्चाच्या गोष्टी-

पीव्हीसी फ्लेक्स बॅनर आयात करणे महाग होईल. काही दूरसंचार उपकरणांची आयात महाग होईल. एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या इक्विटी गुंतवणूक आणि शेअर्स महाग होतील.

सोन्या-चांदीच्या किमती किती कमी होतील?

जर तुम्ही आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याची किंमत आता 67,510 रुपये आहे. सध्या 15 टक्के कस्टम ड्युटी म्हणजेच 10,126 रुपये आयात शुल्क संलग्न आहे. मात्र, आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे.

अशा परिस्थितीत आता याच सोन्याची किंमत सुमारे 62 हजार रुपये असेल. म्हणजेच अर्थसंकल्पाच्या या घोषणेनंतर 10 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे 5 हजार रुपयांनी स्वस्त होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT